Posts

नगर परिषद परतुर मध्ये डिजिटल ॲप द्वारे टॅक्स भरण्याची सुविधा सुरू ....

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर नगरपरिषद हद्दी मधील मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारक तसेच गाळेधारक यांचेकडे किमान तीन कोटी पर्यंत थकबाकी असून अपेक्षित प्रमाणे लोकांद्वारे कर भरणा होत नाही आणि प्रत्येक वेळी रोख उपलब्ध नसल्याचे नवनवीन कारण लोक सांगत असल्याचे निदर्शनास येतात त्यामुळे मुख्याधिकारी श्री परदेशी यांनी क्यू आर कोड द्वारे ,डिजिटल ॲप द्वारे तसेच ऑनलाईन बँकिंग द्वारे कराचा भरणा करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून वसुली पथकास डिजिटल पेमेंट वसूल करण्याकरिता बँकेद्वारे प्रशिक्षण देऊन वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे.    शहरातील नागरिकांना प्रशासनामार्फत योग्य सुविधा देण्याचा मानस आणि ध्येय डोळ्यापुढे ठेवून न पा प्रशासन वसुली मोहीम जोरात राबवीत आहे त्या अनुषंगाने 31 मार्चपर्यंत अधिक सर मागणी आणि वसुली करण्यात येईल मात्र 31 मार्चनंतर थकबाकीदार कडून कठोर कार्यवाही करत वेळप्रसंगी मालमत्ता अटकाव करणे सील करणे, नळ जोडणी बंद करणे तसेच आवश्यकतेनुसार मोठ्या थकबाकीदारांचे नावे शहरातील मुख्य चौकात फलकावर लावणे वेळप्रसंगी ढोल ताशे वाजवून थकबाकीदारांचे मालमत्ते समोर व

जैन विद्यालय येथील होली मिलन महोत्सवातील राजस्थानी पारंपारिक लोकगीते व नृत्याने जालनेकर मंत्रमुग्ध राजस्थानची संस्कृती, विविधता, परंपरेला उजाळा मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश-घनश्याम गोयल

Image
जालना प्रतीनिधी समाधान खरात  महाराष्ट्र मारवाड़ी चॅरिटेबल फाउंडेशन जालना, मारवाडी समेलन व मारवाडी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने होळीच्या पूर्वसंध्येला येथील जैन विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पधारो म्हारो देश’ होली मिलन महोत्सवात राजस्थानी कलावंतांनी सादर केलेली राजस्थानी लोकगीते आणि लोकनृत्याने जालनेकरांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्यावर ठेका धरून उपस्थितानी भरभरून दाद दिली. दरम्यान, राजस्थानची संस्कृती, विविधता, परंपरेची राजस्थानी समाज विशेष करून युवापुढीला ओळख व्हावी, यादृष्टीने खास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष तथा उद्योजक कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल यांनी दिली. महोत्सवाचे उद्घाटन माहेश्वरी विवाह समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक कांतीलाल राठी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मीरा-भाईंदरच्या आमदार सौ. गीता जैन होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारवाडी युवा मंचचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी अग्रवाल, रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी राज्यमंत्री

एक सोहळा प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत- ह भ प विष्णू महाराज बादाड

Image
तळणी प्रतिनिधी रवि पाटील    मनुष्याच्या जिवनामध्ये अनेक सोहळे आहेत तुमचे आमचे सोहळे जिवन मरणाचा सोहळा जिवाचा सोहळा आहे एक पदमीनीचा सोहळा एक सोहळा वारीचा आहे एक सोहळा नाम चितंनाचा आहे एक वैकृठ गमनाचा सोहळा आहे एक ज्ञानोबाच्या समाधीचा सोहळा आहे आणि एक प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो गेल्या पाचशे दशकाच्या नंतर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत असे प्रतिपादन ह भ प विष्णू महाराज बादाड यानी कानडी येथे केले दरवर्षी कानडी येथे श्री कानीफनाथाच्या उत्सवाच्या निमित्याने सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत असते व प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्य या वर्षी रामकथेचे आयोजन करण्यात आले असुन सप्ताह च्या तिसर्या दिवशीच्या सेवेत बोलत होते   प्रभू रामचद्र याची स्वामीकाज गुरू भक्ती पितृवचन सेवाभक्ती यावर महाराजानी निरुपण केले . स्वामी भक्ती काय असावी याचे उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे निस्वार्थ प्रभूरामचद्रांची सेवा करण्याचे परमभाग्य मारोतीरायांना मिळाले . स्वामी म्हणजे मालक .. आणि काज म्हणजे काम करणारे स्वामीची सेवा कशी

शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी तरवटे

Image
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण  परतूर (प्रतिनिधी): हनुमंत दवंडे शिवसेना भटके विमुक्त विभागाच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी निष्ठावंत शिवसैनिक शिवाजी तरवटे (परतूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, यांच्या शिफारशी वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी शिवाजी तरवटे यांची नियुक्ती केली असून हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी  विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तळागळातील भटक्या विमुक्तांपर्यंत पोहोचवावी आणि त्यांना संघटित करून जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवावे असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले .या नियुक्ती बद्दल शिवाजी तरवटे यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.