"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले
प्रतिनिधी तळणी रवी पाटील "संतांचे उपकार आणि त्यांची अनुभूती असल्याशिवाय मनुष्याच्या मनात दान करण्याची प्रवृत्ती निर्माणच होत नाही. संतांच्या साधनेमुळे भूमी पवित्र होते. देवापेक्षा जास्त अधिकार साधू-संतांचाच असतो. म्हणूनच आपण संतांच्या चरणी शरण जातो," असे प्रभावी प्रतिपादन ह. भ. प. विशाल महाराज खोले यांनी येथे केले. श्रावण मासानिमित्त नळडोह येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक महिन्याच्या कालावधीत धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन, हरिपाठ तसेच अन्नदानाचे भव्य आयोजन पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडत आहे. कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले, "या परिसरावर श्री संत जनार्दन महाराज यांचे अमूल्य उपकार आहेत. त्यांच्या सातत्याने चाललेल्या साधनेमुळे ही भूमी पुनीत झाली आहे. दान करण्याची कृती ही मनुष्याच्या अंतरात्म्यात संतांची कृपा असल्यानंतरच प्रकट होते. एखाद्या वेळेस परमेश्वराकडे जाणारा प्रवाह थांबू शकतो, मात्र संतांच्या प्रेमाने तयार झालेला प्रवाह हा कधीच थांबत नाही." यावेळी त्यांनी जगद्गुरु तुकाराम...