भाजयुमोचे प्रदेश महामंत्री लोणिकर यांचे बागेश्वरी साखर कारखाना चेअरमन यांना निवेदन
परतूर(प्रतिनिधी) परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी घेतली. *लोणीकर यांच्या या आक्रमक भूमिकेसमोर कारखाना प्रशासन झुकले असुन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संकलित केल्याशिवाय बाहेरचा ऊस आणणार नाही अशा शब्दात कारखाना व्यवस्थापनाने लोणीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला शब्द दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आज परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन आक्रमकपणे शे