पाहणी पंचनामे बस्स झाले, शेतकऱ्यानं तात्काळ आर्थिक मदतीची गरज -सचिन खरात* *परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ*


जिल्ह्यासह परतूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून गेला तरीही जर सरकार आणि प्रशासन पाहणी आणि पंचनामे करत बसणार असेल तर तुमचे पाहणी, पंचनामे बस्स झाले आता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज असून सरकारने लवकरात लवकर मदत करावी अन्यथा शिवसंग्राम  विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष शेतकरी पुत्र सचिन खरात यांनी दिला आहे.

  जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पाऊस चांगला झाल्याने पिके जोरदार आली होती शेतकऱ्यामध्येही पिके चांगली आल्याने आनंदाचे वातावरन होते मात्र  पिके काढणीस सुरुवात झाली कापूस वेचणीस सुरुवात झाली अन् परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. यामुळे शेतकरी वर्ग फार चिंतेत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच दुःख समजून घेत सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करावी. राज्य सरकार नुसते पाहणी, पंचनामे करत असून आश्वासनाचे गाजर दाखवने सरकारने बंद करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा शिवसंग्राम विद्यार्थी वतीने आदोलन छेडण्यात दण्यात येईल असा इशारा शिवसंग्राम विद्यार्थी ता.सचिन खरात यांनी दिला आहे. यावेळी भाजप विद्यार्थी चे  शुभम कठोरे शिवसंग्राम प्रसिद्धीप्रमुख मनेश वटाणे व मनोज कह्रळे आदी उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....