भाजयुमोचे प्रदेश महामंत्री लोणिकर यांचे बागेश्वरी साखर कारखाना चेअरमन यांना निवेदन


परतूर(प्रतिनिधी)
परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी घेतली.

*लोणीकर यांच्या या आक्रमक  भूमिकेसमोर कारखाना प्रशासन झुकले असुन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संकलित केल्याशिवाय बाहेरचा ऊस आणणार नाही अशा शब्दात कारखाना व्यवस्थापनाने लोणीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला शब्द दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आज परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन आक्रमकपणे शेतकऱ्यांची भूमिका मांडली.*

परतूर व मंठा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत, कुटुंबाचे दागदागिने गहाण ठेवून, त्याकाळात व्याजाने पैसे घेऊन कारखाना उभारणी करताना शेअर्स घेतलेले आहे आज श्रद्धा एनर्जी प्रा.लि. असणारा तत्कालीन बागेश्वरी सहकारी साखर कारखाना त्याचे संस्थापक चेअरमन कै.माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी काही दिवस हा कारखाना चालवला त्यानंतर इतर लोकांच्या हाती कारखान्याची ची सूत्रे गेली आणि त्यानंतर कारखान्यात शेतकरी हितापेक्षा राजकारणाचा जास्त विचार केला गेला आणि त्यामुळे पुढे हा कारखाना विक्री काढणे इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, उसाची लागवड देखील कमी झाली, परिणामी कारखाना बंद पडला. परंतु निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे *आता कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असून तो पूर्णपणे संकलित केल्या शिवाय कार्यक्षेत्र बाहेरचा पाऊस संकलित करणे म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले होते* त्या पार्श्वभूमीवर आज युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह कारखाना व्यवस्थापनाची भेट घेतली.

"बागेश्वरी" कारखाना उभा करताना परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा घामाचा पैसा कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आहे, कार्यक्षेत्रातील स्थानिक शेतकऱ्यांना डावलून शेतकर्‍यांशी केली जाणारी बेइमानी भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा आणि या दोन्ही तालुक्यातील शेतकरी कदापि सहन करणार नाहीत हे देखील कारखाना व्यवस्थापनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. असा स्पष्ट इशारा राहुल लोणीकर यांच्यासह शिष्टमंडळाने कारखाना व्यवस्थापनाला जिल्हा आहे

जोपर्यंत कार्यक्षेत्र मधील ऊसाची नोंदणी होत नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरच्या ऊसाची नोंदणी करण्यात येऊ नये. याबरोबरच जोपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र मधील संपूर्ण ऊस संकलित होत नाही तोपर्यंत कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस संकलित करण्यात येऊ नये. अशा मागण्यांचे निवेदन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल लोणीकर आणि उपस्थित शेतकरी शिष्टमंडळाने कारखाना व्यवस्थापनाला दिले

यावेळी परतुर तालुकाध्यक्ष रमेश भापकर, मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, विलास आकात सभापती संदीप गोरे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात उपसभापती नागेश घारे उपसभापती राजेश मोरे जि प सदस्य पंजाब बोराडे संभाजीराव खंदारे हरिराम माने दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव विठ्ठलराव काळे सुभाष राठोड रामेश्वर तनपुरे दत्तराव कांगणे युवामोर्चा सरचिटणीस संपत टकले युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे गजानन लोणीकर सुधाकर बेरगुडे  अशोकराव बरकुले युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन उफाड निवास देशमुख प्रवीण सातोनकर कृष्णा आरगडे अंकुशराव नवल बबलू सातपुते रवी सोळंके अभिषेक सोळंके ज्ञानेश्वर कांदे संभाजी वारे नारायण बागल राजू ढवळे सिद्धेश्वर मगर सिद्धेश्वर केकाण भुजंग करपे सरपंच नदी पटेल युसुफ पठाण गुलाब सावंत उद्धव गोरे सचिन घाडगे जालिंदर राठोड बाळासाहेब तौर महादेव वाघमारे परमेश्वर केकान गोविंद खरात बंडू मानवतकर शरद मोरे दत्ता धुमाळ विष्णुपंत उगले अरुण खराबे भागवत बागल यांच्यासह दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....