औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी, विभागात आचारसंहिता लागू


 

औरंगाबाद, दि. 2 (विमाका) -  मा. भारत निवडणूक आयोगाने 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. निवडणुकीसाठी मतदान हे मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी तर मतमोजणी गुरुवार, दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून औरंगाबाद विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत  श्री. केंद्रेकर यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.  दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देंशन पत्र भरण्याची अंतिम तारीख राहील. दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल.  दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत मतदान होईल.  मतमोजणी  ही दि. 3 डिसेंबर 2020 रोजी होईल. दि. 7 डिसेंबर 2020 रोजी निवडणुक प्रक्रीया संपेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाणार आहे.  मतदारांसह निवडणूक प्रक्रीयेतील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क अनिवार्य राहणार असून मतदान केद्रांवर सुरक्षित अंतर राखणे,  थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, आरोग्य कर्मचाऱ्यांची  उपलब्धता असणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी नोडल आरोग्य अधिकारी  नियुक्त केला जाणार आहे. अशी माहिती श्री. केंद्रेकर यांनी दिली.


Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....