ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार - राज्यपाल कोश्यारी


मुंबई - समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची आज भेट घेतली यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा काकासाहेब कुलकर्णी यानी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली असता मा राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले .       
       यावेळी  ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यानी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मा राज्यपाल याना सांगितले .
   यावेळी मकरंद कुलकर्णी यानी राज्यसरकार शी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थीती कथन केली .
  यावेळी संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थीतीबाबत  अडचणी कथन केली . 
 तसेच  ॲड आरती सदावर्ते -  पुरंदरे यानी ब्राह्मण समजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या सरक्षंणसाठी कडक कायदे करावे  असेहि त्या म्हणाले 
यावेळी मा राज्यपाल महोदयानी सगळ्या अडचणी  एकून घेउन तसेच सकारात्मक चर्चा करून  राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले .

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात