रुग्णांना लाखाची मदत करत केला वाढदिवस साजरा *सभापती आकात यांचा स्तुत्य उपक्रम
परतूर : वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून सभापती आकात यांनी किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना एक लाख रुपयांची मदत केली.
सभापती कपिल आकात यांचा 21 नोव्हेंबर ला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्व संध्येला सभापती कपिल आकात यांनी वाढदिवसावरील हार, तुरे, शाल श्रीफळ आदी खर्च टाळून याबाबरोबरच लोकांचा वेळही वाया घालणे टाळून गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली. दोन किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या यशोदा दत्ता सागडे व हनुमान खंडागळे यांना प्रत्येकी 25 हाजाराची मदत दिली . तसेच अपघातात जखमी झालेले असराबाई गवारे व ज्ञानेश्वर पारद यांना प्रत्येकी 25 हाजारची रोख मदत केली. याबरोबरच हार , तुरे, होल्ड्रिंग लावण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करावा असे आव्हानही सभापती कपिल आकात यांनी केले. यावेळी उपाअध्यक्ष कुणाल आकात, विजय राखे, महेश आकात, आसाराम लाटे, सरपंच ओंकार काटे सह
रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते