यावेळी भाजपा मराठवाडा पदवीधर निवडणूक जिंकणारच - विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास,कंत्राटदार पदवीधरांचा आमदार झाल्याने पदवीधरांचे बारा वर्ष मातीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात,दरेकर, लोणीकर यांच्यासह उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केले राहुल लोणीकर यांच्या कामाचे कौतुक


 
परतूर(प्रतीनीधी) मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पूर्वी पार भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा मतदारसंघ आहेत या मतदारसंघांमध्ये श्रीकांत जोशी यांच्यासह अनेकांनी पदवीधरांचे प्रश्न मांडले असून पदवीधरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मागील काळात हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या हातातून थोडक्यात निसटला त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या अचानक अपघाती निधनाने भारतीय जनता पार्टीने जवळजवळ ही निवडणूक लढली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती तरीदेखील मागील निवडणुकीत बोराळकर यांचा अगदी थोड्या मताने पराभव करावा लागला होता पण यावेळी मात्र प्रत्येक बूथ पर्यंतची रचना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले असून मागील दोन निवडणुकांमध्ये निवडून दिलेला कंत्राटदार उमेदवार पूर्णपणे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरला असून त्यामुळेच या पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा विजय निश्चितपणे होईल व भारतीय जनता पार्टी मराठवाड्याचा पदवीधर मतदार संघाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला

परतूर येथे आयोजित पदवीधर मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बोलत होते यावेळी मंचावर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर उमेदवार शिरीष बोराळकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मनोज पांगारकर मदनलाल शिंगी गणेशराव खवणे माऊली शेजुळ संदीप गोरे सतीश निर्वळ  प्रकाश टकले संजय तौर राजेश मोरे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात उपसभापती नागेश घारे वीरेंद्र देशमुख जिजाबाई जाधव सर्जेराव जाधव  अंकुशराव बोबडे गणेश काजळे यांची प्रमुख उपस्थिती होती

कंत्राटदार असलेलं व्यक्ती पदवीधर मतदार संघाची मागील दोन वेळा आमदार झाल्यामुळे पदवीधरांची बारा वर्ष मातीत गेले असून पदवीधरांचा एकही प्रश्न मागील काळात विद्यमान पदवीधर आमदारांनी मांडलेला नाही त्यामुळे पदवीधरांना आपले प्रश्न सोडवायचे असतील तर एक नामी संधी त्यांच्या समोर असून शिरीष बोराळकर यांना प्रचंड मताधिक्याने क्रमांक 1 ची पसंती देऊन विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पदवीधर मेळाव्यात केले. मराठवाड्याच्या मतावर निवडून येणारे पदवीधर  मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण हे मराठवाड्याच्या विकासाला खीळ घालणारे असून मराठवाड्याच्या विकासकामात अडथळा निर्माण करण्यासाठी सतीश चव्हाण कायम अग्रेसर असतात त्यामुळे मराठवाड्याच्या मतावर निवडून यायचं आणि मराठवाडा च्या मातीशी बेइमानी करायची असा त्यांचा अजेंडा असून मराठवाड्यातील पदवीधरांनी जागृत होणे गरजेचे आहे असेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले

पदवीधर मतदारांच्या समस्यांचा अभ्यास न करता मागील बारा वर्षापासून विद्यमान आमदार सातत्याने अपयशी ठरला असून शिक्षक वकील डॉक्टर इंजिनिअर बेरोजगार पदवीधर अशा एक ना अनेक पदवीधरांचे अनंत प्रश्न प्रलंबित असून एकदाही मागील बारा वर्षात सतीश चव्हाण यांनी एकही प्रश्न सभागृहात कधी मांडला नाही त्यामुळे विनाअनुदानित अंशतः अनुदानित किंवा अनुदानित असणाऱ्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत 2005 पूर्वी नियुक्त विराम अनुदान अंशतः अनुदान कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न अद्याप चव्हाण यांनी विधान परिषदेच्या पटलावर मांडलेला नाही शाळेचे अनुदान असो की वेतनश्रेणी पेन्शन योजना असो की अनुदानाचा प्रश्न सर्वच स्तरावर शिक्षकांच्या दृष्टीने विद्यमान आमदार अपयशी ठरला आहे त्यामुळे शिरीष बोराळकर यांना संधी देऊन नियोजनबद्ध पद्धतीने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यात यावेत असे आवाहन देखील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केले

बी एच एम एस पदवी असणाऱ्या डॉक्टरांना शासकीय सेवेत रुजू करून घेणे कोरणा काळात करुणा प्रादुर्भावाने बाधित झालेले डॉक्टर त्यांचे कुटुंबीय यांना रुग्ण सेवा देताना आपला जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांपर्यंतची मदत करणे खासगी व्यवस्थेत काम करणाऱ्या आणि आपला जीव धोक्यात टाकून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना विमा कवच देणे यासह गुणवत्तापूर्ण पी पी किट शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रमाणे खाजगी सेवेतील डॉक्टर परिचारक यांना देणे यासारखे एक ना अनेक प्रश्न आहेत परंतु विद्यमान सरकार आणि विद्यमान आमदार याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत त्यामुळे पदवीधरांनी आता विचारपूर्वक आपला उमेदवार निवडून द्यावा कंत्राटदार वृत्तीच्या व्यक्तीला पदवीधरांच्या प्रश्नांची कधीही जाणार नाही अशी टीकाही यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली

*पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध - उमेदवार शिरीष बोराळकर*
मागील बारा वर्षात पदवीधरांची कोणते प्रश्न सुटलेले नसून केवळ निवडणुकीच्या वेळेला निवडून येण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरणारा उमेदवार निवडून द्यायचा की पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार निवडून द्यायचा विचार पदवीधर मतदारांनी करावा पदवीधरांनी विश्वास टाकल्यास त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही त्यामुळे कुणीही जातीपातीच्या किंवा साम-दाम-दंड-भेद याच्या राजकारणाला बळी न पडता समंजसपणे सद्सद्विवेक बुद्धीने विचारपूर्वक मतदान करून क्रमांक एकचा पसंती क्रमांक देऊन मला सेवेची संधी द्यावी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील अशा शब्दात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांनी उपस्थितांना ग्वाही दिली

*दरेकर, लोणीकर यांच्यासह उमेदवार शिरीष बोराळकर यांनी केले राहुल लोणीकर यांच्या कामाचे कौतुक*

संपूर्ण मराठवाडाभर फिरून 26 हजार 722 नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेत राहुल लोणीकर यांनी संपूर्ण मराठवाडाभर युवा मोर्चाच्या माध्यमातून मोठं काम उभं केलं आहे अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर या तिघांनीही राहुल लोणीकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

यावेळी दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव दत्ता कांगणे  प्रदीप ढवळे  संभाजी खंदारे शिवदास हनवते रामेश्वर तनपुरे  विठ्ठलराव काळे  भगवानराव मोरे  ओम शेठ मोर निवास देशमुख  विलास घोडके प्रसादराव बोराडे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस  जिल्हा सरचिटणीस  संपत टकले नगरसेवक संदीप बाहेकर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे गजानन उफाड नितीन सरकटे विकास पालवे राम राठोड सिद्धेश्वर सोळुंके राजू दादा वायाळ संभाजी वारे उद्धव वायाळ तुकाराम सोळुंके रोहन आकात गजानन लिपणे सोळुंके गजानन लोणीकर बंडू मानवतकर प्रवीण सातोनकर जगन बागल प्रकाश चव्हाण संजय गायकवाड बाबाराव थोरात विठ्ठल बिडवे भगवान आरडे नारायण बागल माऊली गोडगे शंतनू काकडे पवन केंजळे मनोज देशमुख आबासाहेब सरकटे अभिषेक सोळुंके गणेशराव चव्हाण माऊली कादे विश्वंभर शेळके हनुमान चिखले महेश पवार अनंता वैद्य कैलास चव्‍हाण कैलास खराबे अनिल चव्हाण तानाजी शेंडगे सचिन राठोड नवनाथ चट्टे अशोक राठोड किशोर सरकटे शिवराज पहिलवान नारियल वाले विनोद दळवी सचिन गाडे राजू पवार गजानन शिंदे शंकर बांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती

*लोणीकर यांच्या नेतृत्वात महावितरण समोर वाढीव वीज बिलाची होळी*
वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी व्यापारी बारा बलुतेदार प्रस्त झाले असून सर्वांनाच अव्वाचे सव्वा वीज बिले देण्यात आली आहेत यासाठी कोणत्याही प्रकारची रीडिंग घेण्यात आलेली नसून अंदाजपंचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची अनास्था आणि महावितरणचे अधिकारी यांची मुजोरी यामुळे सर्वसामान्य नागरिक देशोधडीला लागला असून वाढीव वीज बिलामुळे आत्महत्या करण्याची शुद्ध अनेकांवर आली आहे असे असले तरी देखील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा कारभार सर्वसामान्यांच्या मुळावर आला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली परतूर येथे महावितरणच्या कार्यालयासमोर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली त्यावेळी लोणीकर बोलत होते यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....