महाराष्ट्रात सर्वत्र अराजकता माजविणारे हे मोगलाई प्रवृतीचा सरकार युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांचा घणाघात,तीघाडी सरकारच्या भोंगळ कारभार, जनता माफ करणार नाही - राहुल लोणीकर,मंठ्यात भाजपा युवा मोर्चा आक्रमक, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना जोडे मारत युवा मोर्चाने केलं पुतळ्याचे दहन
तीघाडी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अराजकता माजली असून महाराष्ट्रात जनतेचा सरकारमधून मोगलाईच्या सरकार अस्तित्वात आलो आहे अशी घणाघाती टीका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली मोगलांच्या काळात जे अत्याचार जनतेवर ती होत होते अगदी त्यात पद्धतीचे अत्याचार या सरकारमध्ये किती केले असून शून्य विकास काम करणाऱ्या या आघाडीच्या सरकारला जनता नक्की त्याची जागा दाखवेल असेही ते पुढे बोलताना म्हणाले
मंठा येथे आयोजित वाढीव वीज बिलाच्या होळी करण्यासाठी आयोजित आंदोलनादरम्यान विक्रांतवपतील बोलत होते यावेळी भाजपायुमो चे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन कराड जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, गणेशराव खवणे, पंजाबराव बोराडे, युवमोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती
गेल्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये वीज वितरण कंपनीने केवळ दोन वेळा वीज ग्राहकांना वीज बिले दिली असून दरम्यानच्या काळामध्ये वीज मीटरची रिडींग घेण्यासाठीही कधी कोणी फिरकले नव्हते कोरोना संकटाच्या काळात पाच महिन्यांपासून एकदाच बिल आल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकत सर्वसामान्य ग्राहकांना विज वितरन कंपनीने विजेचा शॉक दिला असून भूलथापा देणार्या सरकारने जनतेची माफी मागावी व दिलेल्या शब्दाप्रमाणे वीज बिल माफ करावे आणि वारंवार शब्द फिरून लोकांची फसवणूक करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक आले तर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विक्रांत पाटील यांनी यावेळी केली.
01 ते 100 युनिट पर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वीज वितरण कंपनी 3 रुपये प्रति युनिट प्रमाणे वीज बील आकारते तर शंभर युनिटचे वर वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट सात रुपयाचे दर आकारले जातात तर हजार युनिट च्या पुढे वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना बारा रुपये युनिट प्रमाणे बिल आकारले जाते मात्र कोरोणा संकटाच्या काळामध्ये पाच ते सहा महिने कुठल्याही प्रकारची रिडींग न घेता गेल्या महिन्याभरापूर्वी रिडींग घेऊन सर्वसामान्य ग्राहकांनी वापरलेले शंभरच्या वरचे जे युनिट आहेत ते पाच महिन्यात वापरले होते मात्र प्रत्येक महिन्याला वीज बिल न दिल्यामुळे या ग्राहकांना तीन रुपया ऐवजी सात रुपये युनिटप्रमाणे वीज बिलाचा भरणा करावा लागत आहे तर 300 ते 400 च्या पुढे प्रतिमहिना युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना हजार च्या पुढे युनिट वापरानंतर विज बिल दिल्यामुळे त्यांना बारा रुपये युनिट प्रमाणे वीज दर आकारला गेला असून त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वीज वितरण कंपनी लुटून खात आहे विजेच्या वाढत्या बिलामुळे काहींनी आत्महत्या केल्या आहेत तर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेमुळे अनेकांचा मृत्यू झाला असताना ऊर्जामंत्री मात्र केंद्रावर आरोप करण्यात व्यस्त आहेत प्रत्यक्षात स्वतः मात्र कोणतीही कृती करताना दिसत नाहीत त्यामुळे हे सरकार जनतेप्रती कृतघ्न असून समुपर्ण जनता या तिघाडी सरकारला त्रस्त झाली आहे, जनता सरकारच्या भोंगळ कारभाराला कंटाळली असून जनताच आता त्यांना धडा शिकवेल महाराष्ट्र सरकारने जनतेच पार वाटोळं करू टाकलं असा आरोप यावेळी राहुल लोणीकर यांनी केला. या वर्षी प्रचंड पडलेल्या पावसामुळे शेती पंपाद्वारे पाणी देण्याचं काम शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून पडलेली नाही कारण मराठवाड्यातील संपूर्ण शेतीही पाण्याखाली होती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वीज बिल आकारू नये अगोदर आस्मानी आणि आता सुलतानी प्रवृत्तीमुळे दुर्दैवी परिस्थिती सर्वसामान्य जनतेवर आली आहे याला महाविकास आघाडीचे सरकार, ऊर्जामंत्री आणि त्यांच्या विभागाचा कारभार कारणीभूत असेही राहुल लोणीकर यावेळी म्हणाले.
ज्या व्यक्तीला मागील काही दिवसात 200 ते 300 रु वीजबिल मिळत होत तिथं लाखो रुपयाचं बिल सर्वसामान्य लोकांनी कुठून भरावं, त्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली याहे वीज वितरण कंपनीने सुद्धा ग्राहकांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता केवळ आणि केवळ सरकारच्या इशार्यावर नाचत सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरुन अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली आहे त्यात आलेली दरमहा आलेली नसून तब्बल सहा सात महिन्यांनंतर विज बिल देण्यात आले आहे त्यामुळे प्रति युनिटचा दर देखील वाढून आला आहे त्यासाठी सर्वसामान्य ग्राहक जबाबदार नसून हेतुपुरस्सर ऊर्जा मंत्र्यांचा आणि ऊर्जा विभागाच्या सांगण्यावरून ही वीज बिले वाढीव स्वरूपात उत्तर देण्यात आली नाहीत ना असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडला आहे विज वितरन कंपनीने हा सावळा गोंधळ थांबवत विज ग्राहकांना न्याय द्यावा अन्यथा आज केवळ वीज बिलांची होळी केली आहे यापुढे सरकार ताळ्यावर न आल्यास यापेक्षा आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील विक्रांत पाटील यांनी यावेळी दिला.
यावेळी संभाजी खंदारे शिवदास हनवते विठ्ठलराव काळे सुभाष राठोड विलास घोडके प्रसादराव बोराडे अशोक वायाळ राजेभाऊ खराबे माऊली गोंडगे मुस्तफा पठाण, बाळासाहेब तौर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे अविनाश राठोड गजानन उफाड नितीन सरकटे विकास पालवे राम राठोड राजू दादा वायाळ संभाजी वारे उद्धव वायाळ गजानन लोणीकर संजय गायकवाड नारायण बागल माऊली गोडगे शंतनू काकडे पवन केंजळे मनोज देशमुख आबासाहेब सरकटे अनंता वैद्य कैलास चव्हाण कैलास खराबे अनिल चव्हाण तानाजी शेंडगे सचिन राठोड नवनाथ चट्टे अशोक राठोड किशोर सरकटे शिवराज पहिलवान नारियलवाले गजानन शिंद याच्याकांची उपस्थिती होती