विद्यार्थी, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - आ. सतीश चव्हाण


मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात अंबड येथे सहविचार सभा पार पडली. यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.  तसंच महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी कशी मिळेल, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातील शाळांसाठी 6 हजार कॉम्पुटर आणि वाचनालयातील पुस्तकांसाठी 4 कोटी रुपये दिल्याची माहिती दिली.. यावेळी सभेला उपस्थित पदाधीकार्यांनी सतीश  चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प व्यक्त केला... दरम्यान या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ऑडिओ कॉल द्वारे सभेला संबोधित केलं. महाविकासघाडीची स्थापना झाल्यानंतर ही महत्त्वाची निवडणूक असून सतीश चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन उपस्थित पदवीधर मतदारांना केलं... यावेळी राष्ट्र्रवादी कॉग्रेस पार्टी,जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख,जि.प.कृषी सभापती मा.विष्णुपंत गायकवाड,माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय मा.भिमराव डोंगरे,प्रभाकर पवार,शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमान धांडे,मा.डॉ.नारायणराव बोराडे,शिवसेना तालुकाध्यक्ष मा.अशोकराव बरडे,कृ.उ.बा.स.सभापती मा.सतिष होंडे,ख.वि.सं.चेअरमन मा.भाऊसाहेब कनके,व्हाईस चेअरमन श्रीरामभाऊ जाधव, उपनगराध्यक्ष न.प.,अंबड मा.केदार कुलकर्णी,कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकरी साखर कारखाना,संचालक मा.कैलास जिगे,राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मा.ॲड संजय काळबांडे,राष्ट्रवादी कॉग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष मा.योगेश ढेंबरे,राष्ट्रवादी कॉग्रेस शहराध्यक्ष मा.ॲड अफरोज पठाण,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस,शहराध्यक्ष मा.अर्जुन भोजने,शिवसेना शहर प्रमुख मा.कुमार रुपवते,पं.स.सदस्य मा.प्रभाकर रणदिवे,मा.चंद्रमणी खरात,शिवाजी कटारे,रजियोद्यीन पटेल,प्रकाश नारायणकर, पंडीतराव कडूळे,सुधाकर हुलमुख,राजण उढाण,अनिल पाष्टे,हाजी फेरोज, कैसरभाई,पाशा पठाण,भगवान शिंदे,रविंद्र डोंगरे,गालेद चाऊस,कैलास भोरे,राहुल खरात,नगरसेवक जाकेर डावरगावकर, काकासाहेब कटारे,शिवप्रसाद चांगले, डॉ.अविनाश वडगावकर, भैय्यासाहेब हातोटे,समदभाई बागवान,ॲड गायके,तकी सिद्यीकी,प्रभाकर डोखळे, प्राचार्य.राजेंद्र गायकवाड,प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे, प्रा.शिवाजीराव मदन,गौतम ढवळे,अनिल गिरे,संदीप राठोड,राजू राठोड,सलीम बागवान,हाजी मनियार,गणेश गडगुळ आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....