परतूर पोलिसांनी 12 हजार 400 रुपयांचा गांजा पकडला, दोघांविरोधात गुन्हा दाखल
परतुर प्रतिनिधी /सय्यद वाजेद
परतूर पोलिसांनी मोटर सायकल वरून गांजा घेऊन जाणाऱ्यांना पकडून 12 हजार 400 रुपयांचा जप्त केला असून दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परतूरकडून सेलूकडे दोघेजण मोटरसायकलवरून गांजा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास परतूर-सेलू रोडवर वरफळ येथे सापळा लावला. त्यावेळी शंकर रामदास पवार (वय 21 वर्षे) आणि रामचंद्र अंकुश घोडे (दोघे रा. सेलू जि. परभणी) हे मोटारसायकल क्रमांक (एम.एच. 16 एएफ 7070) वरून 1238 ग्रॅम वजनाचा 12400 रुपये किमतीचा अमलीपदार्थ गांजा ताब्यात व कब्जात बाळगून वाहतूक करत असताना मिळून आले. त्यावेळी सदर मोटारसायकल चालकाने पोलीस पथकास पाहून त्यांची मोटारसायकल जोरात पळवून मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंख्याचा खाली बराशीत घातली. तेव्हा ही मोटारसायकल बराशीत जावून पडली. मोटारसायकल चालक सोनू उर्फ रामचंद्र घोडे हा तेथून बाजूला असलेल्या तारेच्या कंपाउंडवरून उडी मारून पळून गेला. मात्र शंकर पवार याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अंभोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे पुढील तपास करीतआहेत.
पोलीस अधिक्षक श्री विनायक देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक श्री विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री गौहर हसन,सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे पोलीस उपनिरीक्षक अंभोरे पोशि गणेश शिंदे संजय वैद्य सॅम्युअल गायकवाड यांनी ही कार्यवाही केली.