ग्रामिण रुग्णालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा
परतूर (प्रतीनीधी) ग्रामिण रुग्णालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा करण्यात आला
१ डिसेंबर जागतीक एडस दिनाचे औचित्य साधुन ग्रामिण रुग्नालय परतुर येथे जागतीक एडस दिन साजरा करण्यात आला सदरील कार्यक्रमात जागतिक एकता सामाजिक जबाबदारी या घोषवाक्यानुसार वैद्यकिय अधिक्षक डॉ .डि आर नवल यांनी माहिती दिली व सर्व नागरिकांना आपली एच आय व्ही ची तपासणी करून घ्यावी व स्वतःचे एच आय व्ही चे स्टेट्स जाणून घ्यावे असे आवाहन केले तसेच गोपनीयतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला . सदरील कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ . डि आर नवल . वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ . पी के अंभुरे . डॉ काळे डॉ सिद्दीकी डॉ घुगे डॉ काकडे डॉ माने मॅडम एस टी एस ए. जी.खरात व ग्रामिण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थीत होते सदरिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय सी टी सी समुपदेशक शिवहरी डोळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष संमेटा लिंक वर्कर स्किमचे नरेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले