मराठवाड्या साठी परत दोन रेल्वे राज्यराणी' गुरुवारपासून तर `देवगिरी' शनिवारपासून धावणार...


परभणी, दि. 30 (प्रतिनिधी) ः नांदेडसह परभणी येथील प्रवाशांना मुंबईस जाण्यासाठी आणखी दोन रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सिकंदराबाद - मुंबई (सीएसएमटी) ही देवगिरी एक्स्प्रेस पाच डिसेंबरपासून (शनिवार) तर नांदेड - मुंबई (सीएसएमटी) ही राज्यराणी एक्स्प्रेस तीन डिसेंबरपासून (गुरुवार) धावणार आहे.
गुरुवारपासून (दि.तीन डिसेंबरपासून) नांदेड - मुंबई (सीएसएमटी) राज्यराणी एक्स्प्रेस (क्र. 07611) ही नांदेड येथून रात्री दहा वाजता निघणार आहे. पूर्णा येथे दहा वाजून 28 मिनिटांनी पोचेल, परभणीत रात्री अकरा वाजता, मानवत येथे साडेअकरा, सेलूत 11 वाजून 55 मिनिटांना, परतूरमध्ये 12 वाजून 54 मिनिटांनी, जालनात एक वाजून 45 मिनिटांनी, औरंगाबादेत दोन वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे तीन वाजून 29 मिनिटांनी, रोटेगाव येथे चार वाजून 14 मिनिटांनी, मनमाडमध्ये सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी, नाशिकमध्ये सकाळी सहा वाजून 12 मिनिटांनी, इगतपुरी येथे सात वाजून 20 मिनिटांनी, कल्याण येथे आठ वाजून 53 मिनिटांनी, ठाण्यात नऊ वाजून 13 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टरमिनस येथे सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी पोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात मुंबई (क्र.07612) येथून सायंकाळी पावणे सातवाजता ही रेल्वे निघेल. कल्याणयेथे सात वाजून42 मिनिटांनी पोचेल, नाशीकमध्ये दहा वाजून पाच मिनिटांनी, औरंगाबादेत रात्री एक वाजून 45 मिनिटांनी, जालनात तीन वाजून आठ मिनिटांनी, सेलूत चार वाजून 49 मिनिटांनी, परभणीत सकाळी पाच वाजून 45 मिनिटांनी, तर नांदेडला सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी पोचणार आहे.

देवगिरी एक्स्प्रेस....
तर सिंकदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस (क्र. 07058) ही सिकंदराबाद येथून दुपारी एक वाजून 25 मिनिटांनी निघणार आहे. निजामाबाद येथे तीन वाजून 58 मिनिटांनी, बासरमध्ये चार वाजून 29 मिनिटांनी, धर्माबाद चार वाजून 44 मिनिटांनी, उमरीत पाच वाजून 39 मिनिटांनी, मुदखेडमध्ये सहा वाजन 13 मिनिटांनी, नांदेडमध्ये सहा वाजून 48 मिनिटांनी, पूर्णेत सात वाजून 38 मिनिटांनी तर परभणीत आठ वाजून 20 मिनिटांनी पोचणार आहे. मानवतरोड येथे आठ वाजून 45 मिनिट, सेलूत नऊ वाजून चार मिनिट, परतूरमध्ये नऊ वाजून 29 मिनिट, जालनात रात्री दहा वाजून 13 मिनिटांनी, औरंगाबादमध्ये अकरा वाजून 20 मिनिटांनी, लासूर येथे 11 वाजून 58 मिनिटांनी, रोटेगाव येथे मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी, मनमाड येथे एक वाजून 40 मिनिटांनी, नाशिकरोड येथे दोन वाजून 55 मिनिटांनी, कल्याण येथे सकाळी पाच वाजून 52 मिनिटांनी, ठाणे येथे सहा वाजून दहा मिनिटांनी, दादर येथे सहा वाजून 39 मिनिटांनी तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसर (मुंबई) येथे सकाळी सातवाजून दहा मिनिटांनी पोचेल. परतीचा प्रवास मुंबई (सीएसएमटी) येथून रात्री साडेनऊला सुरू होईल. दादर येथे नऊ वाजून 42 मिनिटांनी, ठाण्यात दहा वाजून 13 मिनिटांनी, कल्याण 10 वाजून 35 मिनिट, नाशीक रोड येथे रात्री एक वाजून 3 मिनिटांनी, मनमाड येथे सव्वादोन वाजता, औरंगाबाद येथे सकाळी चार वाजून 20 मिनिटांनी, जालनात पाच वाजून 23 मिनिट, परतूर पाच वाजून 49 मिनिट, सेलूत सहा वाजून 24 मिनिट, मानवतरोड येथे सहा वाजून 50 मिनिट, परभणीत सात वाजून 33 मिनिटांनी पोचणार आहे. नांदेडमध्ये आठ वाजून 53 मिनिटांनी, बासर येथे सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी, निजामाबाद येथे 11 वाजून 13 मिनिटांनी तर सिकंदाराबाद येते दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी पोचेल.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....