जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तळणी येथे भेट
तळणी : जालना जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यानी आज तळणी येथे विविध तीन ठिकाणी भेट देऊन पाहणी केली सुरवातीला तळणी पोलीस चौकी येथे दप्तर तपासणी करून गावामधील नव्याने बांधलेल्या पोलीस चौकीची नव्याने बांधण्यात आलेल्या ईमारतीची पाहणी करून ऐतिहासीक निजामकालीन गढीची पाहणी केली या ऐतिहासीक वास्तू ची पाहणी करते वेळी त्यानी उपस्थिताकडून या गढी विषयी चा ईतिहास जाणून घेतला निजामकालीन तोफ दरवाजे व दरवाज्या वरिल नक्षीकामाचे कौतूक केले तसेच . या पाहणी दरम्यान विविध जिल्हा च्या सीमा व त्याची माहीती सुध्दा यावेळी त्यांनी घेतली
पोलिसांना सुचना
या पाहणी दरम्यान दिंडी मार्गावरील वाहतूक व अवैध दारू विक्री करणाऱ्या वर कारवाई करण्याच्या सुचना पोलीसांना दिल्या जर परवानाधारक देशी दारू विक्रेता ठोक विक्री करत असेल तर दुकान मालकास सहआरोपी करण्या च्या सुचना सुध्दा त्यानी पोलीसांना दिल्या
यावेळी मंठा पोलीस निकम विलास निकम सह पोलीस निरीक्षक नित्तीन गटूवार तळणी बीट जमादार आर राठोड दिपक आढे गायके आदी पोलीस कर्मचारी उपस्थीत होते
अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचे आदेश
चौकीची पाहणी : जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट
तळणी : तळणी चौकीतंर्गत अवैध दारु विक्रीच्या तक्रारीबाबत मंठा पोलीस निरक्षकांना जाब विचारत अवैध दारू विक्रेत्यावर कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमूख यांनी तळणी चौकीला भेटीदरम्यान दिले . याप्रसंगी पोलीस चौकीच्या बांधकाम व निजामकालीन गढीला भेट देऊन पाहणी केली .
तळणी पोलीस चौकीतंर्गत अवैध दारू विक्रीच्या अनेक तक्रारीचा उल्लेख करत अवैध दारू विक्रेत्यासह देशीचे बॉक्स पूरविणाऱ्या देशी दारू दूकानदाराविरूद्ध कडक कारवाईचे आदेश मंठा पोलीस निरक्षक विलास निकम यांना दिले .