लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, ऐक्याची भावना वाढीस लावण्यासाठी खेळ हे सर्वात महत्त्वाचे माध्यम -- राहुल लोणीकर
परतूर (प्रतिनिधी) युवा शक्ती ला विधायक मार्ग दाखवण्यात व ऐक्याची भावना वाढीस लावण्यास खेळ हे महत्वाचे मध्यम असल्याचे युवमोर्चा प्रदेशमहामंत्री राहुल लोणीकर यांनी प्रतिपादन केले
ते कावजवळा तालुका परतुर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळीउपसभापती रामप्रसाद थोरात, मगर तात्या, पंचायत समिती सदस्य दिगांबर मुजमुले, संपत टकले, कृष्णा आरगडे, सरपंच सोमनाथ मगर, हनुमंतराव चिखले ,शंकरराव पाष्टे, श्रीपात तरासे यांची प्रमुख उपस्थिती होती
पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारणाच्या पटलावर आपला ठसा उमटवत तरुणांनी सामाजिक व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न करावे हिंदुस्तान ला विकसित आणि प्रगल्भ भारत बनवण्याची जवाबदारी युवकावर असून युवकांनी सुदृढ शरीर यष्टी बरोबरच आपल्या कौशल्याच्या जोरावर काम केल्यास निश्चितच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी आपली शक्ती योग्य ठिकाणी पणाला लावावी पुढे ते म्हणाले की व्यसनाधीनता ही एक कीड असून ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी युवा वर्गाने विविध क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून स्वतःचा विकास साधावा यावेळी प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते नाणेफेक करून क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवा वर्गाची उपस्थिती होती