अंबीया बाहरच्या वीमा च्या संदर्भात भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधीकारीना निवेदन

जालना(प्रतीनीधी)
सन 2019 चा मोसंबी आंबिया बहारचा विमा  जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भरला होता परंतु विमा व आघाडी सरकारने जालना जिल्ह्यातील 25 मंडळातील शेतकऱ्याना लाभापासून वंचित ठेऊन शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला तरी विमा कंपनी व प्रशासन यांनी 25मंडळातील शेतकऱ्यांना त्वरित विम्याचा लाभ द्यावा नसता भाजपा किसान मोर्चा च्या वतीने दिनांक 26/01/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदार घनसावंगी* यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना भाजपा अ.जा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,गणेश माधववाले,रामा पाटील खांडे,भाऊसाहेब देवडे,जयराम कोरडे,शुभम सपाटे,विलास चव्हाण व उपस्थित मोठ्या संख्येने शेतकरी व भाजप कार्यकर्ते

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात