राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत दर्शन शिंदे राज्यातून दुसरा

  
जालना (प्रतिनिधी) 
  बीड येथील प्रभास 24 न्यूज कडून १ ते ३० नोव्हेंबर २०२० या काळात राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर हा  माजी खासदार केशरकाकु क्षीरसागर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात उलेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा आणि महापुरुषांच्या विचारांची आवड विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी या उद्देशाने ही वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी आपापल्या वक्तृत्वाचे व्हिडीओ पाठवून सहभाग नोंदविला होता. सदरील स्पर्धेचा निकाल १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये *शालेय गटातून दर्शन एकनाथ शिंदे याचा दुसरा क्रमांक आला*. संस्कार प्रबोधिनी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या दर्शन शिंदे याने *‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य’* या विषयावर स्पर्धेत मत प्रतिपादन केले होते. त्याच्या *व्हिडिओला एकूण ५४३ लाईक्स, ३०० कॉमेंट्स, आणि १५०० विवर्स मिळाले होते.* विजयी स्पर्धकांना महापुरुषाचे चरित्र ग्रंथ, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह पोस्टाने पाठवून गौरविणार असल्याचे संयोजकांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे. 
        दर्शनला स्पर्धेसाठी त्याच्या शाळेतील शिक्षकवृंद, पालक आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याच्या शाळेचे संस्थाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, महानुभाव संप्रदायाचे सुदामराज शास्त्री, नातेवाईक, मित्र परिवारांनी अभिनंदन केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....