रविवारी पत्रकारांची बैठक; शहरासह जिल्हाभरातील पत्रकारांनी उपस्थित राहावे,घटना-संहितेवर होणार चर्चा; पुढील दिशा ठरणार !



जालना ( प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या कल्याणार्थ नव्या संघटनेची पायाभरणी करण्यासंदर्भात जिल्ह्यातील पत्रकारांचे एकमत झाल्यानंतर घटना-संहिता समितीची स्थापना करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने घटना-संहितेवर चर्चा करण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी पत्रकारांची रविवार (दि 20) रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक औरंगाबाद रोडवरील संभाजीनगर कॉर्नर येथील आयएमए हॉल येथे दुपारी 12 होणार आहे. या बैठकीस जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकारांच्यावतीने करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील पत्रकार संघटनांची झालेली गत लक्षात घेता पत्रकार आणि त्यांच्या अडचणींची सोडवणूक करण्याहेतू जिल्ह्यातील पत्रकारांची एक सक्षम संघटना उभारण्याचा निर्णय गत रविवार (दि 13) रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आला होता. त्या बैठकीत झालेल्या चर्चा अंती घटना-संहिता समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत दीपक शेळके, अभयकुमार यादव, अच्युत मोरे, विनोद काळे, अमित कुलकर्णी यांची निवड करण्यात आली होती. या समितीला घटना-संहिता तयार करण्यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात आला होता. त्या अनुषंगाने समितीच्यावतीने घटना-संहिता पत्रकारांसमोर मांडण्यासाठी रविवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत घटना-संहितेवर चर्चा होऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यासाठी जालना शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी या बैठकीस उपस्थित राहून आपले म्हणणे मांडणे आवश्यक असल्याने बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन विजयकुमार सकलेचा, कृष्णा पठाडे, मनोज कोलते, महेश बुलगे, सदानंद देशमुख, शेख मुसा, संतोष भुतेकर, शेख ईलियास अब्बास, भगवान निकम, सोनाजी झेंडे, शिवाजी म्हस्के, राहुल हिवाळे आदी पत्रकारांनी केले आहे.

पत्रकारांच्या अपेक्षांची पूतर्ता करणारी घटना-संहिता
गत रविवार रोजी झालेल्या बैठकीत पत्रकारांनी घटना-संहिता समितीची स्थापना करून त्यात दीपक शेळके, अभयकुमार यादव, अच्युत मोरे, विनोद काळे, अमित कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती. त्याच अनुषंगाने रविवारी (दि 20) होणार्‍या बैठकीत घटना-संहिता मांडण्यात येणार आहे. या घटना-संहितेमध्ये पत्रकारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असत्याची माहिती घटना-संहिता समितीच्या सदस्यांनी दिली. याशिवाय पुढील बैठकीत नव्याने काही सूचना प्राप्त झाल्यास त्याचा समावेश करून त्याच बैठकीत पत्रकारांची त्यास मान्यता घेण्यात येऊन पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचेही समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....