स्वखर्चाने जगवली वनीकरण विभागाची झाडे, परतूर : शिक्षक योगेश बरीदे याचा उपक्रम.

परतूर ,प्रतिनिधी
स्व खर्चाने ठिबक सिंचन  करत सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली तब्बल पन्नास कडू लिंबाचे  झाडे जगविले. 
परतूर चे शिक्षक  योगेश बरीदे यांनी राबविला उपक्रम.
    परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात सह शिक्षक म्हणून कार्यरत असणारे शिक्षक योगेश बरीदे यांची परतूर वाटूर मुख्य रोडवर शेतजमीन आहे . त्यांच्या शेतीच्या कडीला सामाजिक वनीकरण च्या वतीने गत वर्षी जून महिन्यात कडू  लिंबाची  झाडे लावण्यात आली होती. गत वर्षी पाऊस काळ कमी होता या मुळे पाण्याची अडचण होती पण शिक्षक योगेश बरीदे  यांच्या विहिरीला मुबलक पाणी होते आणि याच कडुलिंबाच्या झाडांना खेटून त्यांची सीताफळाची बाग आहे. हे लावलेली झाडे आपल्या सर्वांसाठी फायद्याची आहे असे समजत त्यांनी या पण झाडांना ठिबक सिंचन केले आत्ता हि झाडे चार ते पाच फुटावर असून जिवंत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.,  असा उपक्रम ज्या ठिकाणी रोड च्या कडीला झाडे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन  शिक्षक बरीदे यांनी केले आहे.
              प्रतीक्रीया

*लाल बहादूर शाळेचे 
शिक्षक योगेश बरीदे यांनी जो उपक्रम राबविला त्या बद्दल त्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत असेच सहकार्य सर्व शेतकऱ्यांनी केले तर आपल्या तालुक्यात मोठी वनराई उभा राहील या ठिकाणी आमचे कर्मचारी वेळोवेळी जाऊन त्या झाडांची काळजी घेतात सर्वानी मिळून काळजी घेतली तर काहीच अवघड नाही.
मनीषा मागरदे-(वन विभाग अधिकारी)

 *शिक्षक योगेश बरीदे यांनी जे कार्य हाती घेतले आहे यांच्या सोबत आम्ही आहोत सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाला सहकार्य करावे ही विनंती.
शिवाजी सवणे,वृक्ष मित्र

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात