राजकीय पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेत्यांची धडपड, हा शेतकऱ्यांचा बंद नाही ,शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनिधी
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले असून असे आवाहन करुन सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करणे चुकीचे आहे उद्याचा बंद हा शेतकऱ्यांचा नसून राजकीय पक्षांचा आहे काही नेत्यांना आपले राजकीय पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने पासून धडपड सुरू आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देशातील विविध पक्षांकडून केला जात आहे अशा या भूलथापा उभारलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये असे आवाहन भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी सुधारणा कायदा 2020 अंतर्गत शेतीविषयक कायद्यांमध्ये शेतकरी हिताचे अमुलाग्र बदल केले असून मागील अनेक वर्षांपासून हे सर्व बदल होणे अपेक्षित होते परंतु संपूर्ण देशात सत्ता असतानादेखील काँग्रेस किंवा इतर पक्षांना शेतकरी हिताचे हे निर्णय घेता आले नाहीत दस्तुरखुद्द तत्कालीन कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांनी देखील ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011 मध्ये कृषी कायद्यामध्ये याच प्रकारचा बदल अपेक्षित असून त्या बदलासाठी पाठिंबा देण्याबाबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला होता परंतु आज मात्र केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासह देशातील विविध पक्ष काही स्वयंघोषित शेतकरी संघटना या कायद्याला विरोध करत आहेत ही बाब अत्यंत निंदनीय असल्याची टीका देखील लोणीकर यांनी केली

नवीन कृषि सुधारणा विधेयक 2020 बाबत अनेक अपप्रचार केले जात असून त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या जमिनी व्यापाऱ्यांच्या घशात घातल्या जाणार आहेत अशा प्रकारचा अपप्रचार केला जातो आहे ही बाब पूर्णपणे चुकीची असून या कायद्याअंतर्गत केवळ शेतकऱ्यांच्या शेतमालाचा करार केला जाणार आहे येत जमिनीबाबत कोणत्याही प्रकारचा करार किंवा खरेदी विक्री केली जाणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

या कायद्या अंतर्गत शेतमाल विक्रीचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यात आले आहे त्यामुळे कोणताही शेतकरी ज्या ठिकाणी आपल्याला जास्त भाव मिळेल अशा ठिकाणी आपला शेतमाल विक्री करू शकतो एखादी कंपनी संबंधित शेतकऱ्यांशी शेतमालाचा करार करून शेतमाल शेतात तयार होण्याअगोदर त्याचा भाव ठरवून घेऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे एक प्रकारे हमी मिळणार आहे त्यामुळे या कायद्याला कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही परंतु पंजाब मधील काही आडती हमाल आणि एजंटगिरी करणारे लोक या कायद्याला विरोध करत आहेत या आंदोलनाच्या नावाखाली काँग्रेस पक्षाला आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आणि मोदी देशासाठी किती चुकीचे आहेत हे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे परंतु या कायद्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय अगदी स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा या कायद्याला विरोध नाही परंतु या कायद्यामुळे या लोकांची दुकानदारी बंद होणार आहे त्या लोकांचा मात्र या कायद्याला विरोध आहे आणि तेच लोक रस्त्यावर ती उतरले आहेत असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होतील अशा प्रकारचा अपप्रचार देखील काँग्रेस आणि काँग्रेसचे सहकारी पक्ष करत आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र या कायद्यामध्ये कुठेही कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचे प्रावधान नाही त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना शेतकऱ्यांच्या मालाला अधिकाधिक भाव द्यावा लागणार आहे बाजार समित्यांमध्ये अधिक भाव मिळाला तर शेतकरी आपला म** बाजार समिती मध्ये विक्री करेल अन्यथा ज्या ठिकाणी जास्त भावाने मालक खरेदी केला जाईल त्या ठिकाणी विक्री करण्याचे त्याला स्वातंत्र्य असेल त्यामुळे बाजार समित्या कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीत ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यांना लक्षात घ्यावी लागेल प्रत्यक्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष याबाबत अपप्रचार करत आहेत तो अपप्रचार त्यांनी थांबवावा अन्यथा शेतकरी त्यांना कधीही माफ करणार नाही असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताचे घेतलेले निर्णय यामुळे काँग्रेससह इतर राजकीय पक्षांची अवस्था हातघाईला आली असून आपापल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि केवळ मोदीविरोध म्हणून या कायद्याला विरोध करण्याचं इतर पक्षांनी ठरवला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना याबाबत पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे राजकीय द्वेषाने उभे राहिलेल्या या आंदोलनाला प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा पाठिंबा नाही आणि या राजकीय पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे त्यांनी सुद्धा हा कायदा काय आहे तो समजून घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असणाऱ्या या कायद्याला विरोध न करता शेतकऱ्यांच्या बाजूने हा कायदा सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील लोणीकर यांनी यावेळी केले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....