लोणिकरांचा वाढदिवस वीवीध उपक्रमाने साजरा,मान्यवरांनी पत्रांद्वारे,फोनद्वारे दिल्या शूभेच्छा
परतूर (प्रतिनधी) भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजल्यापासून मतदार संघा सह मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी आले होते
दुपारी 12 वाजता आर पी एल क्रिकेट स्पर्धाचे राहुल लोणीकर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले त्या नंतर शहरातील विविध ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते त्यानंतर दुपारी एक वाजता आष्टी तालुका परतुर येथे ढोल-ताशांच्या गजरामध्ये भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या मोटर सायकल रॅली मध्ये 1000 च्या वर युवकांनी सहभाग नोंदवला येथील बस स्टँड परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर युवा नेते राहुल लोणीकर यांची लाडू तुला करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले त्यानंतर आष्टी येथील शिवराज क्रीडांगणावर आर एल पी एल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन राहुल लोणीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याचबरोबर गरजूंना ब्लँकेटचे वाटप विविध ठिकाणी फळ वाटपाचे कार्यक्रम करण्यात आली तर विविध ठिकाणी रांगोळ्यांची आरास करून युवा नेत्याचा सत्कार करताना कार्यकर्ते दिसत होते दरम्यान विविध स्तरातील मान्यवरांनी भ्रमणध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून राहुल लोणीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यासोबत माजी मंत्री तथा परतूर मंठा तालुक्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनीही यांनीही पत्राद्वारे शुभाशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी परतूर मंठा नेर शेवली सह मराठवाड्यातील विविध स्तरातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला