शेतकरी अनुदान वाटपाची गती आणखी वाढवा जिल्हा बँकेत शेतकर्याचे पैसे सुरक्षीत मुख्याध्यीकारी आशुतोष देशमुख यांचे आव्हाहन दोन कोटी बत्तीस लाख रुपयाचे अनुदान प्राप्त पाच हजाराच्या वर शेतकर्याना मिळनार लाभ



तळणी ः जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शेतकर्याच्या अनुदान वाटप व प्रधान मत्री किसान सन्मान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याना त्याचे वाटप लवकरात लवकर करण्याचे आव्हाहन मुख्याधाकारी  देशमुख यानी केले कारण या वर्षीचा सपूर्ण खरीप हंगाम हा शेतकर्याचा वाया गेला आहे शासनाकडून प्राप्त झालेली मदत  ही शेतकर्यासाठी आधार असुन येणाऱ्या रब्बी हंगामासाठी थोडाफार हातभार या मदतीचा होऊ शकतो सपूर्ण जिल्हा भरातील शाखांना व्यवस्थीत आर्थीक पूरवठा होत असुन आर्थीक पूरय ठया सदर्भात कुठलीच अडचण सध्या नसल्याचे त्यानी सांगितले जिल्हाभरातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांमधून रोज शेतकर्याना अनुदान मोठया प्रमाणात वाटप करण्यात येत आहे कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीत सुध्दा बँक कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेऊन वाटपाचे नियोजन स्थानिक स्तरावर करत आहे.                                           अशूतोष देशमुख -
(जिल्हा बँके मध्ये जास्तीत जास्त ही शेतकर्याची खाती आहेत शेतकर्याच्या खात्यातील रक्कम ही जिल्हा बँकेत  सुरक्षीत असुन बँकेचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक असुन जास्तीत ठेवी शेतकर्यानी जिल्हा बँकेत ठेवण्याचे आव्हाहन तळणी भेटीदरम्यान  त्यानी केले  याद्यातील खातेनंबर सदर्भात बऱ्याच शेतकर्याच्या अडचणी होत्या त्या सदर्भातील महसुल अधिकाऱ्याशी चर्चा करुन ती अडचण सुध्दा कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे 
आशुतोष देशमुख 
मुख्याधिकारी जिल्हा सहकारी बॅंक )

तसेच  पी एम सन्मान निधी सदर्भातील अनुदान सुध्दा काही दिवसांनी सुरू होणार असुन त्याचे सुध्दा वाटपाचे नियोजन प्रत्येक बॅक केडून सुरु आहे या योजने दरम्यान बऱ्याचशेतकर्याच्या आधार कार्ड लिक च्या अडचणी असुन संबधीत यञणेकडून ते अद्ययावत करून घेण्याचे आव्हाहन मुख्याधिकारी आशुतोष देशमुख यानी केले आहे
  .              राजेद्र मस्के-
[तळणी इंचा टाकळखोपा वाघाळा शिरपूर देवठाणा कानडी उस्वद सासखेडा (स ) वडगाव कोकंरबां लिबंखेडा आंदवाडी हनवतखेडा खोरवड या पंधरा गावातील ५०७४ शेतकर्याना दोन कोटी बत्तीस लक्ष रुपयाची अनुदान प्राप्त असुन गावनिहाय त्याचे वाटप सुरू असल्याचे बॅक व्यवस्थापक राजेद्र मस्के यांनी सांगीतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....