तब्बल नऊ महीन्याच्या प्रदिर्घ कालावधी नंतर फिरायलेत रसंवतीची चाके
परतूर दि.09 प्रतिनिधी
तब्बल नऊ महिन्या नंतर फिरला रासावंतीचा चरखा लहान मुलांसह जेष्ठ नागरिक घेत आहे ऊस पिण्याचा आनंद.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 22 मार्च पासून लॉक डाऊन झाल्याने मागील वर्षी रसवंती चालक मोठे अडचणीत आले होते पण या वर्षी नवीन ऊस तयार होताच परिसरात रासावंतीचा चरखा फिरू लागला व जेष्ठ नागरिकांसाहित सर्वच स्तरातील माणसे रस पिण्याचा मोह अनावर झाला. परतूर वाटूर रोड वरील बरीदे रसवंती वर रसाचा आस्वाद घेताना शर्मा क्रिकेट अकॅडमी चे विद्यार्थी सोबत प्रशिक्षक संतोष शर्मा,भाऊसाहेब मुके
आरती मुके(विध्याथी)
मागील वर्षी कोरोना मुळे आम्हाला ऊसाचा रस पिण्यासाठी मिळाला नाही. पण या वर्षी लवकरच रसवंती चालू झाल्याने आम्ही रस पिण्याचा आनंद घेत आहोत.
शिवाजी मुझमुले-(रसवंती चालक)
गत वर्षी कोरोना मुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. या पार्श्वभूमीवर या वर्षी लवकरच रसवंती गर्घ चालू करण्यात आले नागरिकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत आहे.