कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलण्यात महापाप करू नये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा कारखाना प्रशासनाला इशारा,कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा लोणीकर यांचा चेअरमन शिवाजीराव जाधव यांना मैत्रीपूर्ण सल्ला, शिष्टमंडळासह घेतली
परतूर व मंठा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले शेत, कुटुंबाचे दागदागिने गहाण ठेवून, त्याकाळात व्याजाने पैसे घेऊन कारखाना उभारणी करताना शेअर्स घेतलेले आहे आज श्रद्धा एनर्जी प्रा.लि. असणारा तत्कालीन बागेश्वरी सहकारी साखर कारखाना त्याचे संस्थापक चेअरमन कै.माजी आमदार वैजनाथराव आकात यांनी काही दिवस हा कारखाना चालवला त्यानंतर कारखान्यात शेतकरी हितापेक्षा राजकारणाचा जास्त विचार केला गेला आणि त्यामुळे पुढे हा कारखाना विक्री काढणे इतपत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, उसाची लागवड देखील कमी झाली, परिणामी कारखाना बंद पडला परंतु निम्न दुधना प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे आता परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्याच्या घामाच्या पैशातून उभा राहिलेला हा कारखाना कवडीमोल भावाने खरेदी केला असून किमान या गोष्टीची तरी जाणीव कारखानदारांनी ठेवावी असेही यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले
बागेश्वरी सहकारी साखर कारखाना स्थापन करताना कारखान्याचे कार्यक्षेत्र परतूर व मंठा तालुका असे ठरविण्यात आले होते त्यानंतर हा कारखाना श्रद्धा एनर्जी प्रा.लि. यांना विक्री केल्यानंतर देखील कारखान्याचे कार्यक्षेत्र परतूर व मंठा तालुका असेच आहे. परंतु आता मात्र कारखाना प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कारखान्याच्या चौफेर हवाई अंतर प्रमाणे पन्नास किलोमीटर परिसरातील संकलित करता येऊ शकतो परंतु तसे केले असता कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पासून पूर्वेस पन्नास किलोमीटर मोजले असता सेलू तालुका दक्षिणेस माजलगाव तालुका घनसावंगी तालुका कार्यक्षेत्र येते परंतु असे झाले तर मुळतः ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर हा कारखाना उभा राहिला त्या शेतकऱ्यांवर पूर्णपणे अन्याय झाला असेच म्हणावे लागेल असे लोणीकर यावेळी म्हणाले
यापूर्वी देखील माजलगाव येथील माजी आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी त्यांच्या माजलगाव सहकारी साखर कारखान्याअंतर्गत बागेश्वरी कारखाना चालवण्यासाठी घेतला होता त्यांनीदेखील त्यावेळी अशाच प्रकारचा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस संकलित करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी देखील शेतकऱ्यांनी आंदोलन करून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणणाऱ्या गाड्यांचे टायर फोडण्यात आले होते, आंदोलनाने त्यावेळी खूप गंभीर स्वरूप धारण केले होते ही बाब कारखाना व्यवस्थापनाने विसरता कामा नये. "बागेश्वरी" कारखाना उभा करताना परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा घामाचा पैसा कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आहे, कार्यक्षेत्रातील स्थानिक शेतकऱ्यांना डावलून शेतकर्यांशी केली जाणारी बेइमानी मंठा परतुर दोन्ही तालुक्यातील शेतकरी कदापि सहन करणार नाहीत हे देखील कारखाना व्यवस्थापनाने लक्षात घेणे गरजेचे आहे. असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाची भेट घेऊन ऊस संकलन करण्याबाबतच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली यावेळी लोणीकर यांनी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांना मैत्रीपूर्ण सल्ला दिला व कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस संकलित केल्यास कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होतील व परिणामी कारखाना बंद पडतील मागील वेळी देखील अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी देखील कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले होते त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला
जोपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र मधील संपूर्ण ऊस संकलित होत नाही तोपर्यंत कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस संकलित करण्यात येऊ नये. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन कारखाना व्यवस्थापक कडे केली आहे, हा कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर उभा राहिला आहे त्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी त्या वेळी भरलेली शेअर्सची रक्कम देखील अद्याप मिळालेली नाही. कारखाना खरेदी करताना आपल्याकडून देखील स्थानिक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल अशी अट आपण मान्य केलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस संकलित केला जाऊ नये अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे. यापलीकडे जर कारखाना व्यवस्थापनाने स्थानिक कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस संकलित करण्याचा घाट घातलाच तर अशावेळी निर्माण होणार्या परिस्थितीला पूर्णपणे कारखाना व्यवस्थापन जबाबदार असेल याची व्यवस्थापनाने नोंद घ्यावी. अशी मागणी लोणीकर यांनी यावेळी केली
कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस संकलित करावा यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर सहकारमंत्री साखर आयुक्त साखर उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यापूर्वी देखील राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ने लोकशाही पद्धतीने आंदोलन केले होते यावेळी राहुल लोणीकर यांनी अत्यंत विनम्रपणे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून कार्यक्षेत्रातील ऊस संकलित करावा अशी मागणी केली होती मात्र कारखाना प्रशासनाने या गोष्टीकडे या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे कानाडोळा करत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना लावण्याचं काम केलं आहे त्यामुळे यानंतरही कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार नसेल तर आपण स्वतः अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करणार असून रिणामी होणार्या नुकसान कारखाना प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला