परतुर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रुपये 7 हजार 478 लाभार्थयांच्या खत्यात जमा,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नामुळे वृध्द अपगांना मिळाले मानधन
परतूर प्रतिनिधी - श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत परतूर तालुक्यातील 7 हजार 478 वृद्ध, अपंग, विधवा, निराधार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 कोटी 86 लाख 72 हजार 700 रु मानधन जमा झाले असून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी वृद्ध,अपंग, निराधारांना मानधन सुरू व्हावे यासाठी वेळोवेळी विविध ठिकाणी कॅम्प लावून मिळावे घेऊन लाभार्थ्यांच्या मानधनाचा मार्ग मोकळा केला होता त्यामुळे परतूर तालुक्यातील 7 हजार 478 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून लाभार्थ्यांकडून माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना धन्यवाद दिले जात आहे.
परतूर तालुक्यामध्ये श्रावण बाळ योजनेचे अ गटातील लाभार्थी 2835 असून त्यांना 65 लाख 63 हजार 700 तर ब गटामध्ये 90 लक्ष 90 हजार रुपयाचे अनुदान जमा झाले आहे तर संजय गांधी योजने अंतर्गत 198 विधवा लाभार्थ्यांना 2 लाख 77 हजार 200 व अपंग लाभार्थ्यांना 1 लाख 56 हजार 800 तर निराधार योजनेतील 1333 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 26 लाख 66 हजार रुपये मानधन जमा झाले आहे अशी माहिती भाजपाच्यावतीने दिली आहे