कलशाव रोहण : ऊस्वद येथील व्यकेश्वर महादेव मदीराचा कलशावरोहण सपन्न
तळणी : ( रवि पाटील )येथून जवळच असलेलेल्या उस्वद येथील व्यकेश्वर महादेव मंदीराचा कलशावरोहणाचा कार्यक्रम सपन्न झाला गेल्या तीन दिवसापासुन ब्रम्हवृदाच्या मञघोषात हा सोहळा सपन्न झाला पूर्णा नदीच्या तीरावर असलेल्या या हेमाडपथी मंदीराचा जीर्णध्दार गावकरी व पंचक्रोशीतील भावीकाच्या मदतीने करण्यात आला असुन बेचाळीस फुट उंचीचे भव्य दिव्य मखर यावेळी नव्याने बांधण्यात आले या प्राचीन मंदीराचा भांगवत स्कंदामध्ये सुध्दा उल्लेख आहे पुसद नगरी म्हणून असा नामोल्लेख भागवत स्कंदामध्ये आहे असे ग्रामस्थ सागतात पुसद नावावरूनच नंतर उस्वद असे नामकरण झाले नवसाला पावणारा महादेव मंदीर मणून सपूर्ण मंठा तालुक्यात प्रसिद्ध आहे याच कलशावरोहण प्रसंगी ह भ प भगवान महाराज सेलुकर यांचे हरि कीर्तन ठेवण्यात आले होते
आपुला तो एक देव करूनी घ्यावा
तेने विणा जीवा सुख नोव्हे
हेरती माईक दुःखाची जणीती
नाही आदी अंती अवसान
या जगदगुरु तुकाराम महाराजाच्या गाथ्यातील अंभगावर सुंदर निरुपण केले आजच्या या कलयुगात देवाला आपलेसे करणारा खरा पुण्यवान कारण आज काल देवफक्त संकटे आल्यावर आठवतो माईक म्हणजे व्यर्थ तुम्ही भगवान परमार्थाच नामचितंन व्यर्थ म्हणून जरी केले तरी ते तुमच्या पुण्य संचयात नक्कीच वाढ करेल तुकोबारायानी देवाला आपले करून घेतले म्हणून वैकुठप्राप्त झाले ते त्यानी त्याच्या भक्ती वेळोवेळी सिद्ध केले आहे सांसंरीक जीवन जगत असताना कमीत कमी गरजा भागवून मानूस सध्या जगू शकत नाही पैसा ऐश्वर्य त्याला स्वस्थ बसु देत नाही गरजे पुरते असले की त्यात समाधान मानावे हावरुपी वासनेला मनुष्य बळी पडत्त असत पारमार्थीक गोडी त्याची कमी झाली आहे महाराजांनी या वेळेस अनेक उदाहरणे देऊन मञ मुग्ध केले
मनुष्यालाआपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे मग त्याच्या कामाचे स्वरूप काहीही असो. पण त्याने सद्गुण मात्र जोपासले पाहिजेत भगवत भक्ती केली पाहीजे तरच तो अधिकार प्राप्त होतो नाही
ज्या गुणाने दुसऱ्याला सुख शांती प्राप्त होईल त्या गुणाला मी वंद्य मानतो. दुःख न देता सुख देणे हीच अहिंसा होय. दुसरा गुण सत्यवाचा हा आहे. निंदा , वृथास्तुती , खोटे बोलणे टाळणारा सत्य वचनी असतो. चोरी न करणे म्हणजे अचौर्य हा पुढला गुण होय. परस्त्रीला मातेसमान मानतो तो अकाम म्हणजे निरिच्छ होय. *काम ताब्यात आला की क्रोधाचे काही चालत नाही कारण कामाशिवाय क्रोध कधीही वाढत नाही कामक्रोधाबरोबर लोभही नाहीसा होतो दिव्याच्या ज्योतिबरोबर वात आणि काजळी असतात तसे कामाबरोबरच क्रोध आणि मोह नांदतात पुढील गुण म्हणजे अंतःकरणात सर्व प्राणिमात्राविषयी कळवळा असावा. त्यांचे जमेल तेवढे हित करावे.
असे सद्गुण जो बाळगतो त्याच्या दुःख संकटांची मी होळी करून टाकतो. सर्व वर्णांचा हाच मुख्य धर्म होय
प्रत्येकाला आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे मग त्याच्या कामाचे स्वरूप काहीही असो. पण त्याने सद्गुण मात्र जोपासले पाहिजेत ते जोपासल्या गेले तर कोणा विषयी द्वेश भावना निर्माण होणार नाही आज कालच्या वातावरणात द्वेष भावनेला पांठीबा देणाऱ्याची सख्या वाढती आहे ते धर्मास मान्य नाही ती आपली सस्कृंती नाही संत सहवासाच्या सानी ध्यात राहुन मिळालेल्या या नरदेहाचा उध्दार करुन घ्या मनुष्य आपल्याला मिळालेला मनुष्य जन्म हा मागच्या जन्माच्या पुण्याई वर प्राप्त झाला आहे तो पुन्हा पुन्हा प्राप्त करायचा असेल तर भगवत भक्ती करा तरच तो प्राप्त होईल
राम मंदीरासाठी आव्हान
या किर्तन सोहळ्याच्या निमित्य महाराजांनी राम मंदीरासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आव्हाहन केले गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वांगत करण्यात आले आहे या समाज मंदीराला राष्ट्र मंदीर करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकाने स्वच्छ मनाने सहभाग नो दवांवा कारण प्रभु श्रीराम आपले आस्तीत्व आहे ते टिकवून ठेवण्यासाठी त्याचे आस्तीत्व असणे गरजेचे आहे येणाऱ्या पिढीला हा सगळा इतीहास माहीत असला पाहीजे अनेकांच्या बलीदानाची आठवण या मंदीर निर्मीती नंतर ही समाज मनात कायम राहील
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
माधवराव सरोदे राम चट्टे वामनराव देशमुख शिवाजी सरोदे सिधु महाराज सरोदे नवनाथ चट्टे माधव काकडे वंसतराव राऊत व सर्व ग्रामस्थानी मोठे परिश्रम घेतले
'