राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व विवेकानंद जयंती निमित्त परतुरात युवा गौरव सन्मान वितरण संपन्न,विविध क्षेत्रातील युवक, युवतींचा करण्यात आला सन्मान,युवकांनी सतत कार्यमग्न राहून देशाचे नाव उज्वल करावे : -राहुल लोणीकर
परतूर (प्रतिनधी) युवकांनी आपल्या अवडीच्या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करत स्वतः बरोबरच देशाचे नाव उज्जवल करावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी केले
ते परतूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त संपन्न झालेल्या युवा गौरव सन्मान वितरण समारंभा प्रसंगी बोलत होते
या वेळी व्यासपीठावर व्यख्याते हरी कवडे, भाजपा ता अध्यक्ष रमेश भापकर, ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे, दया काटे ,हरिराम माने ,रंगनाथ येवले शहाजी राक्षे ,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले ,भाजपा युवा मोर्चा परतुर तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे, भाजयुमो मंठा तालुका अध्यक्ष अविनाश राठोड, डॉक्टर संदीप चव्हाण, डॉक्टर भक्ती नंद ,यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद ,छत्रपती शिवाजी महाराज या महान विभूतींनी युवा अवस्थेमध्ये या देशाला आपले मोठे योगदान दिले होते याच आदर्शावर तरुणांनी आपले कर्तत्व सिद्ध करत आपले गाव जिल्हा राज्य देशाचे नाव लौकिक वाढवावे कुठल्याही क्षेत्रांमध्ये प्रगतीचा उच्चांक गाठण्यासाठी युवकांनी कठोर मेहनत घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले
पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आज युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये अशा प्रकारचा युवांचा गुणगौरव करीत असून राज्यातील युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले
यावेळी लेखक तथा व्याख्याते हरी कवडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत उपस्थितांना आदर्शाच्या पायवाटा काय असाव्यात यासंदर्भात मार्गदर्शन केले यावेळी सन्मान प्राप्त डॉक्टर भक्ति नंद, पत्रकार मंजुषा काळे ,पत्रकार ,आशिष गारकर, ऍड अभय जवळेकर ऐश्वर्या तनपुरे यांची समयोचित भाषणे झाली
कु श्रावणी बरकुले हिने सर्वांना आपल्या काव्य गायनाने मंत्रमुग्ध केले
या प्रसंगी कु श्रावणी विष्णुपंत बरकुले (काव्य वाचन),कु ऐश्वर्या नवनाथ तनपुरे( उत्कृष्ट वक्ता) डॉ सौ भक्ती दत्तात्रय नंद(उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), डॉ संदीप चव्हाण( उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), कु निकिता लक्ष्मण बंड (उत्कृष्ठ गायीका), कु गोदावरी गायकवाड(उत्कृष्ट गायीका), पवन माने( उत्कृष्ट कुस्तीपटू), जुनेद खा पठाण( उत्कृष्ट कुस्तीपटू) योगेश कुलकर्णी( टीव्ही कलाकार), प्रेम संतोष शर्मा( क्रिकेटर) विश्वजीत विनोद बंण( क्रिकेटर), रवी रोहिदास बोनगे (क्रिकेट चॅम्पियनशिप उत्कृष्ट कामगिरी) कु आरती भाऊसाहेब मुके (महिला क्रिकेटर), कु साक्षी संतोष आकमार (धावपटू), ॲड अभय जवळेकर (उत्कृष्ट विधिविषयक समाजाभिमुख कार्य) आशिष गारकर (पुरस्कार प्राप्त पत्रकार) बालाजी ढोबळे (पुरस्कार प्राप्त पत्रकार), रवींद्र वनवे (कोरोना योद्धा), हनुमान काळे ( कोरोना योद्धा),रामदास वायाळ (कोरोना योद्धा), दिनेश गादेवार (गुणवंत कामगार) पवन झोल (कराटे चॅम्पियन), मंजुषा काळे (महिला पत्रकारिता ) , हर्षल वाघमारे (उत्कृष्ट क्रिकेट पटू) , डॉ स्वाती संजय पवार (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा ) ,योगेश कृष्णा चव्हाण (कोरोना काळात उत्कृष्ट अध्यापन कार्य) यश गोपाल तिवारी (रक्तदान) ,देविदास खंडागळे( वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी) डॉ प्रधान (कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी) सरफराज कायमखानी (जीवन गौरव) इत्यादी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या युवक-युवतींचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी नगरसेवक प्रकाश चव्हाण, नगरसेवक कृष्णा अरगडे, नगरसेवक प्रवीण सतोनकर, राजेंद्र मुंदडा,कृष्णा मोठे, संतोष हिवाळे,प्रमोद राठोड, सोनू अग्रवाल,ज्ञानेश्वर जईद,बंडू मानवतकर, सपंच नदीम भाई, मलिक कुरेशी, मुज्जू कायमखाणी,सरफराज कायमखाणी, संतोष शर्मा भाऊसाहेब मुके यांची उपस्थतीती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण बागल व सी एन खवल यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती