प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाचे पळी-ताम्हण आंदोलन. , परतुरःसमाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी ब्राम्हण समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करुन उपजिल्हाधिकारी कार्यालय परतूर येथे निवेदन सादर केले.
परतूर (प्रतीनीधी ) आखाली भारतीय बहूभाषीक ब्राम्हण महासंघाच्या वतीने उपवीभागिय अधीकारी कार्यालया समोर पळी ताम्हण वाजवून आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात
समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करावे,तरुण व व्यावसायिकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन 1000कोटीची तरतुद करावी,जिल्हास्थानी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करावे,ब्राम्हण समाजाविषयी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यावर शिक्षा करणारा कायदा करावा,स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा,पुरोहित्य करणाऱ्यास 5000/मानधन सुरु करावे.कुळात गेलेल्या जमीन परत देण्यात याव्या आदी मागण्यासाठी समाजातर्फे यापुर्वी आझाद मैदान येथे आंदोलन,तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन आमदार-खासदार यांना स्मरण पत्राद्वारे जागो सरकार-जागो असे अभियान राबवण्यात आली,हिवाळी अधिवेशनात सुध्दा समाजाच्या मागण्यावर विचार झाला नाही,तेव्हा समाजाने या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी पळी-ताम्हण वाजवुन आंदोलन केले.
शासनाने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असे निवेदनात म्हटले,निवेदनावर अँड.भगवानरावजी कवडी,अँड.डोल्हारकर,अँड.ए.आर.देशपांडे नगरसेवक मुरलीधर देशमुख,राजेश खंडेलवाल,माजी नगरसेवक विजय नाना राखे,लक्ष्मीकांत कवडी,सौ.अरुणाताई चामणीकर, उदय नेब वे.शा.स.तुकाराम गुरु गोळेगावकर,हरी गुरु जोशी,अंँड.प्रदीप राखे,नंदकिशोर कुलकर्णी,शामसुंदर चितोडा,समीर राखे, शाम जवळेकर,योगेश खंडेलवाल, सिध्दार्थ कुलकर्णी,प्रसाद बाप्ते,केदार शर्मा,योगेश रोहीनकर, शाम डंख,हेमंत कुलकर्णी कल्याण अंबेकर,परिमल पेडगावकर पंकज कद्रे,अश्विन दायमा,अँड.पराग कुरुंदकर,पंकज पांडे,संतोष बोर्डे,संदिप पाटील,वल्लभ सारस्वत आदीच्या स्वाक्षया आहेत.