मंठा येथील महावीर जीनींगवर कार्यवाही करण्याची मनसे विद्यार्थी सेनेची मागणी



मंठा (प्रतीनीधी)येथील तळणी रोडवरील महावीर जीनींगकडुन शेतकर्यांची फसवणुक व अर्थीक लुट होत आसल्याचा आरोप *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंठा तहसिलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महावीर जीनींगमध्ये शेतकरी राजा सोबत फसवणुकीचे काम सुरू आसुन शासनाच्या हमी भावापेक्षा खुप कमी भावाने या जीनींग चालकांकडुन शेतकर्यांचा कापुस खरेदी केला जात आहे. म्हणुन शेतकर्यांवर अन्याय होत आसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वर्षी अतिवृष्टी ने कापुस पिक कमी आले होते. कारण या वर्षीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांची खुप मोठी नासाडी झाली होती. राज्य व केंद्र सरकारने शेतकर्यांना योग्य प्रकारे अर्थीक मदत केली नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या कारणामुळे शेतकरी अर्थीक आडचणीत आहे.  यातच जिनींग,आडत हे शेतकर्यांची फसवणुक करुन लुटतांना दिसत आहे. शेतकर्यांनी नेमकं जगायचं कसं आसा सवाल मनसेचे काकडे यांनी ऊपस्थीत केला आहे.  मंठा येथील महावीर जीनींगमध्ये शेतकर्‍यां सोबत गैर वर्तणुक केली जाते. व शेतकरी राजाची हेळसांड व अर्थीक लुट केली जात आहे. या जीनींग चालकाने खुप कमी भावाने शेतकर्यांचा कापुस खरेदी केला आहे. म्हणुन या महावीर जीनींगवर तातडीने कार्यवाही करावी नसता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलनाची भुमीका घेतली जाईल आसा ईशारा सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे मंठा तालुका अध्यक्ष मारोती लोमटे  ऊपस्थीत होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....