आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर महत्त्वाचा- कान्होजी जेधे यांचे वंशज राजधीर जेधे यांचे प्रतिपादन,शिवरायांच्या विचारातून आधुनिक राष्ट्राची निर्मिती - इतिहास संशोधक विलास सोनवणे यांचे मत,युवकांनी शिवविचारांचा आणि कर्तृत्वाचा जागर करावा, मोरे पाटील परिवाराचा अत्यंत स्तुत्य उपक्रम - भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


मंठा(प्रतिनिधी)
आधुनिक काळात शिवरायांचे विचार हेच मार्गदर्शिका असून शिवरायांच्या विचार आणि आचार मार्गावर गेल्यास आधुनिक काळात प्रत्येक जण शोधू शकतो म्हणून आधुनिक काळात शिवरायांच्या विचारांचा जागर खूप महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शहाजीराजांचे सहकारी मित्र व शिवरायांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी कान्होजी जेधे यांचे १४ वे वंशज राजधीर जेधे यांनी केले.

शिवरायांचे विचार संपूर्ण जगाच्या पाठीवर अद्वितिय असून शिवरायांच्या विचारावरच आधुनिक राष्ट्राची नवनिर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक विलास सोनवणे यांनी केले मोरे पाटील परिवार आयोजित शिवजन्मोत्सव २०२१ निमित्त आयोजित कार्यक्रमात राजधीर जेधे व विलास जी सोनवणे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर होते यावेळी राजधीर जेधे यांना शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर विलास सोनवणे यांना शिवस्वराज्य भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी संत नामदेव महाराज यांच्या साहित्यावर पीएचडी प्राप्त करणारे डॉ. एकनाथ शिंदे कोरोना काळात प्रभावी काम करणारे डॉ.स्वप्नील मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकणारे युवा कवी शेख शब्बीर तर समाज माध्यमांवर रानमळा च्या वाटा या नावाने विविध मान्यवर कवींच्या कवितांच्या माध्यमातून भन्नाट प्रसिद्धी मिळवणारी बाल कवयित्री श्रावणी विष्णू बरकुले या चौघांचा शिवसृष्टी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नासा मध्ये

आधुनिक काळात देशाचा नवनिर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची नितांत आवश्यकता असून शिवरायांच्या विचाराशिवाय युवकांची आधुनिक पिढी घडू शकणार नाही असे प्रतिपादन राजधीर जेधे यांनी केले तर नवयुवक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचे वाचन करून सत्य इतिहास विचारात घेतला पाहिजे शिवरायांच्या विचारावरच भावी पिढीचे भवितव्य अवलंबून असल्याचे यावेळी इतिहाससंशोधक विलास सोनवणे यांनी स्पष्ट केले

छत्रपती शिवरायांचा विचार आणि आचार नवीन पिढीसाठी मार्गदर्शक असून शिवरायांच्या विचारांशिवाय नवीन पिढी घडूच शकत नाही असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी यावेळी केले छत्रपती शिवरायांच्या विचारातून आणि विचारातूनच नवी पिढी घडू शकते असे सांगत छत्रपती शिवरायांच्या विचारांना दुसरा पर्याय असू शकत नाही असेही राहुल लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

यावेळी डॉ. एकनाथ शिंदे शेख शब्बीर श्रावणी बरकुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मोरे पाटील परिवार व मोरे हॉस्पिटल मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मोरे पाटील परिवाराच्या वतीने मागील १४ वर्षांपासून शिवजन्मोत्सव निमित्त रक्तदान शिबीर, स्नेहभोज व पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला जातो. शिवरायांच्या इतिहासाशी जोडले जाऊन शिव विचारांचा जागर आम्हाला करण्याची संधी मिळाली हे आमचे आहोभाग्य असल्याचे यावेळी आयोजक प्रा सहदेव मोरे पाटील व डॉ कल्याण मोरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ काकडे, तर आभार प्रदर्शन कु. सई सहदेव मोरे यांनी केले. यावेळी आयोजक बाबासाहेब पाटील मोरे, किसनराव पाटील मोरे, गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, किसनराव मोरे, राजेश मोरे, रमेश भापकर, कैलास बोराडे, प्रकाश टकले, माऊली शेजुळ, नागेश घारे, अड. हरिभाऊ काकडे, नाथराव काकडे, पंजाबराव बोराडे, शत्रुघ्न कणसे, उदय बोराडे, डॉ.शरद पालवे, विठ्ठलराव काळे, पवन केंधळे, विक्रम उफाड, अरुण खराबे, विष्णू बरकुळे, नारायण बागल, मनोज देशमुख, किसनराव चव्हाळ, विलास भुतेकर, नारायण मगर, विलास घोडके, ओमप्रकाश देठे, महेश पवार, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर वायाळ, राजेभाऊ खराबे, दीपक दवणे, महादेव नानवटे, अशोक वायाळ, गणेश चव्हाळ, किशोर हनवते, राजू नरवडे, दत्तूसेठ झंवर, शाम काकडे, शरद बाहेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....