समाजाने संतांचे विचार अवगत करावे-प्रदिप फुलमाळी
परतुर/प्रतिनिधी
येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सम्राट आशोक मित्र मंडळाचे संतोष हिवाळेप्रमुख पाहूणे नगरसेवक श्रीकांत उन्मुखे,कृष्णा आरगडे संदिप काळे होते.यावेळी चर्मकार महासंघाचे युवा नेते प्रदिप फुलमाळी यांनी संत रविदास महाराजांच्या कार्याची माहिती दिली. समाजाने जागृत होऊन संत रविदास महाराजांचे विचार अवगत करून युवकांनी उच्च शिक्षणाकडे वळावे जेणेकरुन समाजाची प्रगती होईल.सदर कार्यक्रमाला मुन्ना चित्तोडा,सावता जईद,अजय देसाई, ज्ञानेश्वर जईद,गणेश हिवाळे,शंकर ठाकुर,पत्रकार माणिक जैस्वाल,संजय देशमाने ,आदी उपस्थित होते.