संपादक सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना जालन्यात श्रध्दांजली
जालना,दि.५ (प्रतिनिधी) साप्ताहिक लोकअहवालचे संपादक तथा ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते स्व. सुरेंद्रकुमार किशनलाल जायस्वाल (६६) यांना आज शनिवारी असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडियम न्यूज पेपर्स इंडीयाच्या जालना शाखेच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
हॉटेल मधुबन येथे आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासकुमार बागडी, पत्रकार श्रीमती आयेशा मुलानी, पारस नंद, मुकेश परमार, दिनेश नंद, अशपाक पटेल, राहुल वाहुळे, शेख इर्शाद, नाजीम मनियार, फेरोज मनियार, शेख मुजिनोद्दीन, बालाजी अडियाल, मयूर अग्रवाल, गोपाल भुरेवाल, मधुकर मुळे, धनंजय देशमुख, रुख्मीनीकांत दिक्षीत, विजय सकलेचा, संतोष भुतेकर, राजेश भालेराव, दिपक शेळके, साहिल पाटील, मनोज कोलते, सुनिल खरात, रवि दानम, गणेश वैद्य, नरेश धारपावरे आदींसह विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थिती होते. प्रारंभी स्व. सुरेंद्रकुमार जायस्वाल यांना उपस्थित पत्रकारांनी श्रध्दांजली अर्पण केली.