कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला हवेत? नाशिक ऑक्सिजन गळतीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सवाल,नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, महाराष्ट्रातील सर्व ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलची तात्काळ तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करा - लोणीकरांची मागणी*===================
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता असताना नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१ एप्रिल) बारा- साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या रुग्णालयातील अनेक रुग्ण ऑक्सिजनवर व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आणि मन अगदी सुन्न झालं आहे. कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला अपेक्षित आहेत? असा सवाल करत या ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणानंतर केली आहे.
मागील २ महिन्यातील हि तब्बल ८ वी घटना असून कोरोना काळात सरकारच्या गलथान कारभारामुळे, बोगस किटचा वापर करणे त्यामुळे पॉझिटिव्ह नसताना कोरोना पॉझिटिव्ह येणे किंवा आजच्या घटनेप्रमाणे मृत्यूचा सामना करावा लागतो आहे. त्यातच तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक बनत गेली अशा परिस्थितीत त्या ठिकणी रुग्णांच्या उपस्थित नातेवाईकांना हा प्रकार लक्षात येताच स्वतः रुग्णाजवळ धाव घेऊन त्यांना जागवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु त्यांना त्यात यश आलं नाही. रुग्णाच्या नातेवाईकांच्या प्रचंड आक्रोशाने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवन्यात आला आहे.
नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळती हि अत्यंत दुर्दैवी बाब असून याबाबत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी यापुढे सजग राहून इतर रुग्णालयातील ऑक्सिजन सुविधेची काटेकोर पाहणी करावी. त्याचबरोबर या सर्व रुग्णांना इतरत्र सर्व सेवा सुविधा युक्त हॉस्पिटलमध्ये हलवावे. या घटनेला मानवी यंत्रणा जबाबदार असलयास त्यांच्यावर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यात यावी, त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलची तात्काळ तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करून अशी घटना महाराष्ट्रात पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी’, अशी मागणी लोणीकरांनी केली आहे.