आंबा येथे कोविड लसीकरण कॅम्प,युवामोर्चा ने घेतला पुढाकार,माजी मंत्री बबनराव लोणीकर,प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला पुढाकार

परतूर(प्रतिनधी) आंबा ता परतूर येथे भा ज यु मो च्या वतीने माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा ग्रामपंचायत व युमो कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण कॅम्प संपन्न झाला.
  आज महाराष्ट्र राज्यात कोविड चा प्रकोप मोठ्या प्रमाणावर असून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे म्हणून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा नेते राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी कॅम्प घेण्यात आला असून आज 121 जणांना कोविड ची लस देण्यात आली
लसीकरण करून घेणे ही काळाची गरज असून या कामात राजकीय हेवे दावे विसरून प्रत्येक गावात असे कॅम्प करणे गरजेचे आहे त्या मुळे आंबा गावचा आदर्श घेऊन तालुक्यातील गावांनी लसीकरण मोहीम  राबवणे गरजेचे असल्याचे बोनगे यांनी म्हंटले आहे
  या प्रसंगी सरपंच मेराज खतीब उपसरपंच महादेव वीर, दत्ता आढाव प्रशांत बोनगे रामा कोरडे कृष्णा भदर्गे डॉक्टर सचिन वायाळ श्री भाताने आडे आरोग्य सेवक श्रीमती खरात आरोग्यसेविका श्रीमती कपाळे आशा वर्कर श्रीमती काळदाते आशा वर्कर उद्धव बोनगे राजु कोरडे सुनील बोनगे राहुल भदर्गे विठ्ठल बोनगे तुटे साहेब विशंभर हरकळ ज्ञानदेव राऊत दीपक भदर्गे इत्यादी सह अनेकांनी सहकार्य केले

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात