डॉ.आंबेडकर जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करा ll सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आवाहन ll

परतूर,दि.८(प्रतिनिधी) -  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोना नियमांचे पालन करत घरातच साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.
     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे.
परंतु सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व बौद्ध विहारात मोजक्याच उपासकाच्या उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून बौद्ध वंदना घ्यावी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व  बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत  घरातच करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. घरावर पंचशील व निळा ध्वज उभारावा तसेच रोषणाई करावी असे आवाहन ही अर्जुन पाडेवार यांनी केले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....