विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर जाहिर करा-कॉ.आर.बी.आढाव
परतूर(प्रतीनीधी) विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषीत करण्यात यावे आशि मागणि वीभागिय सचिव कॉम्रेड रमेश आढाव यांनी केली
परतूर येथे विज उद्योग क्षेञातील काम करणारे सर्व कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहिर करावे.लसीकरणाची सुविधा प्राधान्याने उपलब्द करुन देण्यात यावी.विज कर्मचारी यांच्यावर कोरोना आजारपणात बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी.तसेच औषधोपचाराची सुविधा अधिक प्राधान्याने पुरवण्यात यावी.या मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या परतूर उपविभागीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
यावेळी
.एन.व्ही.बेंडाळे(उपकार्यकारी अभियंता),.प्रविण गणेर (सहाय्यक अभियंता),मंगेश रामटेके(सहाय्यक अभियंता)
कॉ.आर.बी.आढाव(विभागिय सचिव),कॉ.के.पी.कुलकर्णी,कॉ.नाथा साकळकर,कॉ.किसन यादव,कॉ.योगेश मोरे,कॉ.बि.एस.दोन्डे,कॉ.मनोज शिंदे,कॉ.सय्यद नौशाद व इतर सभासद व कर्मचारी उपस्थित होते