मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्यांच्या वसुली थांबवा - काकडे





मंठा(प्रतीनीधी)
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार ऊडाला आसून अनेक कुटुंबातील सदस्यांना ऊपचारा अभावी आपला जिव गमवावा लागत आसुन गोर गरीब सर्व सामान्य लोकांनी ऊपचार नेमका करायचा कसा? आसा प्रश्न पडलेला आसतांनाच जालना जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्या सर्व सामान्य व गोर गरीब लोकांना कर्ज वसुलीसाठी वेठीस धरत आहे. हि वसुली तातडीने थांबवावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देऊन केली आहे. जालना जिल्ह्यातील सर्वच मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्या सर्व सामान्य लोकांना वेठीस धरत आसल्याचा आरोप मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. राज्यात कडक निर्बंध आसतांना देखील व लाॅकडाऊन आसुन देखील हातावर पोट भरणाऱ्या लोकांची  पिळवणूक होत आसुन या फायनान्स कंपन्यांच्या चाजामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कुटुंबातील कुटुंब प्रमुखांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली असताना जालना जिल्हाधिकारी कोणतीही ठोस भूमिका घेत  नसल्याने सिद्धेश्वर काकडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मायक्रो फायनान्स फायनान्स कंपन्यांची तातडीने वसुली थांबवाव. कारण सध्या  मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपनीचे कर्ज  हे गोरगरीब लोक फेडू शकत नाही. असे  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....