मराठा आरक्षणावर चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने, आमच्या हक्काचे वस्तीगृह सुरू करावे,जालना जिल्ह्यात वस्तीगृहाच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक,*माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात 151 गावांमध्ये आंदोलन


परतूर(प्रतिनिधी)
तात्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण राज्यातील आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात टिकवता आले नाही राज्यातील सरकार मराठा आरक्षणाबाबत  वेळकाढूपणा करत आहे यासंदर्भात सरकारच्या या कृतीवर मराठा समाज प्रचंड संतापलेला असून राज्यभरात 58  मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणासाठी प्राणांच्या आहुती द्याव्या लागल्या होत्या
    या सगळ्या बाबींचा विचार करून सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडायला हवी होती मात्र तसे सरकारने केले नाही त्याचबरोबर राज्यात फडणवीस सरकार असताना मराठा समाजातील मुलांसाठी राज्यभरामध्ये जिल्हा स्तरावर वस्तीगृह उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये वस्तीगृह सुरू झालं होतं तर काही वस्तीगृहा ची कामे अंतिम टप्प्यात होती मात्र निवडणुका लागल्या आणि दुर्दैवाने सत्तांतर झाले बदललेल्या सत्ताधीशांनी मराठा मुलांच्या वस्तीगृहांचा प्रश्न अनुत्तरित ठेवला यावर कळस म्हणून जालना येथे तर पालकमंत्री राजेश टोपे यांनी या नियोजित वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये घुसखोरी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बसवण्याचा प्रयत्न केला 
तात्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हे वस्तीगृह प्रस्तावित केले होते सदरील वसतिगृहाचे काम पूर्ण झालेले होते अशा परिस्थितीमध्ये ठाकरे सरकारने निर्णय घेऊन जालना जिल्ह्यासह राज्यातील सर्व वस्तीगृह मराठा मुलांसाठी खुली करावयास हवी होती मात्र तसे न झाल्याने जिल्ह्यातील भाजपा व मराठा समाजातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून यामुळे जिल्ह्यातील परतूर मंठा जालना घनसांगी तालुक्यातील 151 गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात येऊन राज्यातील मराठा समाजाचे वस्तीगृह तात्काळ सुरू करावेत त्याचबरोबर जालना येथील वस्तीगृहातील घुसखोरी थांबून मराठा समाजाला न्याय द्यावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे परतुर येथील कार्यालय परतूर येथे ठेवावे या मागण्यांसाठी दिवसभर तीव्र निदर्शने करण्यात आली
=======================
  *जिल्हाभरात भाजपाचा आक्रमक पवित्रा*
=======================
महत्प्रयासाने मिळवलेले आरक्षण टिकवू न शकलेल्या तिघाडी सरकार चा  धिक्कार करत गावागावांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रश्नावरून दिवसभर आंदोलन करण्यात आले इतिहासात प्रथमच सरकारचा निषेध करण्यासाठी गावागावातील ग्रामपंचायतींच्या कार्यालयासमोर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी तात्कालीन फडणवीस सरकारच्या काळामध्ये स्व जिल्ह्यातील मराठा विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थित शासकीय विश्रामगृहामध्ये मध्ये वस्तीग्रह साठी जागा उपलब्ध करून दिली होती या वस्तीगृहातील सर्व कामे पूर्ण झाली होती रंगरंगोटी करून सज्ज असलेल्या इमारतीमध्ये पालकमंत्री राजेश टोपे यांनी घुसखोरी करून परतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय घुसवण्याचा डाव टाकला हा डाव हाणून पाडण्यासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून आज त्याचा प्रत्यय आला गावागावांमध्ये कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला या आंदोलना मध्ये सहभागी होत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात आंदोलन केले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....