गाव तिथं शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करा - जिल्हाप्रमुख बोराडे
परतूर /प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसंपर्क आभियान मोहीम दि.१२ जुलै ते २४ जुलै दरम्यान राबवण्यात येत असून परतूर शहरातील डाँ.आण्णाभाउ साठे नगर येथे शिवसंपर्क अभियान अंतर्गत परिसरातील शिवसैनिक व नागरीकांशी बैठकीद्वारे संवांद साधण्यात आला. यात जिल्हाप्रमुख बोराडे यांनी सांगितले की , मुख्यमंत्री यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणुका होत आहेत यासाठी बुथ बांधणी पासून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तयारी केली पाहिजे तसेच शहरातील संपूर्ण शाखा तयार केल्या पाहिजेत.शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीही आव्हान याप्रसंगी बोराडे यांनी केले. या आव्हानास शिवसैनिकांनी व नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला.यावेळी जालना जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, जिल्हाउपप्रमुख बाबाजी तेलगड ,तालुका प्रमुख अशोकराव आघाव,शहर प्रमुख दत्ता सुरुंग , शहर प्रमुख (गाव) विदुर जईद ,युवासेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे ,मधुकर पाईकराव, युवासेना शहर प्रमुख राहुल कदम, बापु घटमाळ, आबासाहेब कदम,लखन हिवाळे , साहेबराव पवार,अण्णा पवार यांची उपस्थिती होती. बैठक यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहर उपप्रमुख दिपक हिवाळे ,दलीत आघाडी शहरप्रमुख सर्जेराव हिवाळे,कामगार सेना शहर प्रमुख अशोक हिवाळे,व कामगार सेना भगवान घोडे यांनी विशेष परीश्रम घेतली.