डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत,त्यांना कधी पकडणार-जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली आहे सीबीआयने त्यांच्या मारेकऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे मात्र,मुख्य सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार,असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल यांनी केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परतुरच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येच्या मुख्य सुत्रधारांना पकडण्यात यावे याकरिता उपविभागीय कार्यालय परतूर येथे निवेदन देण्यात आले होते याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कल्याण बागल बोलत होते याप्रसंगी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परतूर तालुका अध्यक्ष एकनाथ कदम,जिल्हा प्रधान सचिव रमाकांत बरीदे,संभाजी तांगडे,दिलीप अण्णा मगर,सुनील खरात,अश्विन गुंजकर,लक्ष्मीकांत माने,देशमुख के.एन.,संतोष रनबावळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना कल्याण बागल म्हटले की,विज्ञानवादी समाजसुधारक डॉ.दाभोलकर,कॉ.गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत.सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले, की खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ.गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आला आहे यामुळे डॉ.दाभोलकर यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे,अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत,कार्यकर्ते,पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नसल्याचे कल्याण बागल यांनी म्हटले आहे.