आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे गणेशोत्सवाच्या निमित्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार विदर्भरत्न ह भ प पूरूषोत्तम महाराज पाटील यांच्या एकदिवसीय हरी किर्तनाचे आयोजन तळणी  परीसरातील प्रसिद्ध युवा उद्योजक शरद पाटील व भगवान देशमुख याच्या वतीने या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या    *आपुला तो एक देव करुनी घ्यावा*
*तेणे विन जिवा सुख नोहे* *येरती माईक दुःखाची जनीती*
*नाही आदी अंती अवसान*
 या अभंगावर सुंदर निरूपण केले सध्य स्थितीचा काळ हा मानव जातीच्या परीक्षेचा काळ आहे धर्ममंडपात बसलेली लोक ही खरच भाग्यवान आहेत कोरोना सारख्या महामारीत आपंण जिवंत आहोत या महामारीतून जर आपल्याला वाचायचे असेल तर धार्मीक विचाराचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल महामारीच्या काळात वारकरी सप्रदायच खूप मोठा आधार आहे सध्य स्थितीत मानव जातीची मानसीक अवस्था सक्षम असणे गरजेचे आहे कोरोना ने मानवी जीवनातील गरजा कीती कमी आहेत यांची जाणीव आपल्या सगळ्याना करून दीली आहे  मनुष्याच्या आयुष्यातील नामसाधना ही त्याच्यासाठी खूप मोठा आधार असते परतू आज काल तीच साधना करण्याचा आळस आपल्याकडून होत आहे मानवी जीवनात या जगात भक्तीचा सुकाळ निर्माण झाला तरच मनुष्य जातीला सुखाने जीवन जगता येईल माऊली ज्ञानोबारायांनी रचलेल्या पायावर तुकाराम मंहारांजांनी कळस चढवीला आजच्या या धावपळीच्या जीवनातील परिस्थीती व महाराजाच्या काळातील भक्तीमय परिस्थीती खूप वेगळी आहे देव धर्म करण्यासही प्रतिबंध असताना स्वःचे कर्तव्य व धर्मासाठीची असलेली जगद्गुरु तुकाराम महाराज याची  निष्ठा आजच्या थोतांड भक्ती करणाऱ्याना एक चपराकच म्हणावी लागेल कारण महाराजानी केलेली भक्ती व साधना ही धर्माच्या उध्दारासाठी होती तीच्यात स्वार्थ मुळीच नव्हता या भक्तीच्या व साधनेच्या जोरावरच जंगाचा मालक पांडुरग परमात्मा प्रत्येक वेळेस संकट समयी खंबीर उभा राहीला आपला भक्ती भाव हा संत मीरा सारखा असला पाहीजे मीरेची भक्ती ही त्यागी भक्ती होती आज काल मनुष्य भौतीक सुखाच्या जास्त मागे लागला आहे स्वःत पूरते पाहण्याची सवय जास्त वाढत चालली आहे संसारीक आयुष्यात गुरफटलेल्या मानवास सांधना व अध्यात्मिकतेचे जोड दीली तर मानवी जीवनात दोनही गोष्टी साध्य होतील याच गोष्टीचा स्वीकार जगदगूरू तुकाराम महाराजानी केला म्हणून वैकूठ प्राप्त झाले त्याचाच आदर्श आज समाजाने घेऊन मिळालेले छोटेसे आयुष्य कारणी लावणी गरजेचे आहे

हिन्दू धर्मामधील सण उत्सव साजरे करत असताना आपण इतर धर्मीयाकडून काही शिकने गरजेचे आहे विशेष करून गणेशोत्सव काळातील जे चिञ विचिञ उपक्रम आयोजीत केले जाते ते उपक्रम लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला कदापी अपेक्षीत नाही त्या काळाती परीस्थीतीचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहीजे समाज एकसंघ रहावा हा जो मुख्य उद्देश टिळकांचा होता तो उद्देश आज काल दिसुन येत नाही सार्वजनिक उत्सवामध्ये सगळ्याचा सहभाग असणे गरजेचे आहे या सहभागामधूनच आपल्या सस्कृंतीचे प्रदर्शन होत असते ती टिकली तर आपला देश टिकेल देव देश आणि धर्मावर बोलणाऱ्याची संख्या कमी नाही आपला संघटीतपणाच त्याना उत्तर देऊ शकतो 

गाईचे जतन करा आज गाईवर मोठे संकट आहे गाय शेतकर्याचा आधार आहे तीच संगोपन करा शेतकर्याची आर्थीक उन्नती होण्यासाठी राजसतेने प्रामाणीक प्रयत्न करणे गरजेचे आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे स्वातत्र्य पूर्व काळापासून कायम शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष झाले आहे तो टिकने गरजेचे आहे महामारीत सुध्दा माझ्या शेतकर्यांना जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे गरीबीची जाणीव ठेवा जमेल तेवढी मदत करा जुण्या काळापेक्षा आजची परीस्थीती नक्कीच चांगली आहे जमेल तीतकी मदत गरजूना करा समाजात खूप लोक मोठी आहेत गरज आहे ती पूढे येऊन मदत करण्याची तरच तुमचे आयुष्य सार्थकी लागेल 
महाराष्ट्रात सर्वाधिक दारुविक्री फक्त गणेशोत्सव मिरवणूक व शिवाजी महाराज जयंतीच्या काळात होत असेततर कुठे नेऊन ठेवलाय आमचा धर्म असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. गणपतीची स्थापना करा. पण , हिन्दी गाणे वाजवून नका . सर्वांनी हिन्दु धर्माची जोपसणा केली पाहीजे, तुम्हाला आवडेल तसा परमार्थ करु नका , देवाला आवडेल असा भक्तांनी परमार्थ करावा . देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही . देशावर व राज्यांवर संकट आलेले असतानाही काहीनी फक्त पैशा पाहीला . मद्दतीची भावना न ठेवता रेमडेशीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे आपण पाहिलेत. जीवनातील व्यसने , अवगुन व दोष कमी करणे म्हणजेच गणरायाची एका अर्थाने स्थापना करणे होय , आजच्या तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे, शेतक-यांच्या मुलांनी नवनवीन व्यवसायिक शिक्षण घेऊन शेतीबरोबर जोडधंदे करावे , तरुणांनी देशप्रेम, राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम जपले पाहीजे , आईवडीलची सेवा करा. ईश्वर तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही, असे   ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी सांगितले. यावेळी तळणीसह पंचक्रोशीतील महिलांसह भाविकांची मोठी उपस्थिती होती.

बावळट सरकार कधीपण तिसरी घाट आणेल ...

पहिलेच तर दोन वर्ष झालेत घरीच आहोत. आता कुठे नेमकेच सुरु झालेतर हे बावळट सरकार कधीपण तिसरी लाट आणेल. पण, येणार नाही. मला हेच राजकीय लोकांचा कोरोना सासरा आहे की जावई ? असेही ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.

या सपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री कृपा कन्ट्रक्शन व आराध्या कन्ट्रक्शन यांच्या कडून करण्यात आले होते नेमिनाथ महाराज सस्थानचे विष्णू महाराज बादाड अर्जून महाराज बादाड विजय महाराज वाघ  व सस्थेतील सर्व विद्याथ्र्यानी किर्तनासाठी उत्कृष्ट साथ दिली 
तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर माऊली सरकटे भगवान सरकटे नितीन सरकटे गोविंदराव देशमुख सोपानराव पाटील नवनाथ देशमुख गजानन कांगने डॉ रवि देशमुख राहुल भडदम रामेश्वर देशमुख नवनाथ पाटील लखन चंदेल रवि सांगळे विष्णू वाघ आदीनी परिश्रम घेतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....