परतूर तालुक्यातील 25 शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक,शिक्षकरत्न,शिक्षक समाजभुषण पुरस्कार

परतूर/प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या परतूर शाखेच्या कार्यकारणीची बैठक जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.विष्णु वाघमारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भापकर,ता सचिव सुरेश तोटे,तालुका नेते कैलास उफाड,शिवाजी भानुसे,अरुण भांडवलकर,ता.उपा.राजेश लोखंडे,तुकाराम आकात,ता.कोषाध्यक्ष सोमनाथ उदेवाळ,राहुल सरकटे,सह सचिव गौतम गणकवार,अंकुश चिखले,ता.सं.राम काळदाते,जितेंद्र गायकवाड,,सोपान वडेकर,विनोद सातोनकर,बाबासाहेब गायकवाड,विजय सावंत,ता.प्र.प्रमुख एजाज देशमुख,शेख नजर,पूरुषोत्तम चाटे,भारसाकळे,भदर्गे ज्ञानोबा लहाने,इंद्रजित भगस,प्रकाश आढे,यांच्या उपस्थित पार पाडली त्यात शैक्षणिक वर्षे 2019-2020 व 2020-2021 मध्ये परतूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात भरघोस योगदान देणाऱ्या 22 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर एका शिक्षकाला शिक्षकरत्न व दोन शिक्षकांना शिक्षक समाजभुषण पुरस्काराने गौरविण्याचे घोषित करण्यात आले मागील एक महिन्यापासुन पुरस्कार निवड समितीने मागील दोन वर्षाच्या शिक्षकाच्या शैक्षणिक,सामाजिक,राष्ट्रीय कार्याचे मुल्यमापन करून तालुका जिल्हा कार्यकारणीकडे प्रत्येक केंद्रातुन व 2019-2020 व 2021 साठी प्रत्येक दोन शिक्षकाच्या नावाची शिफारस तर एका शिक्षकाला शिक्षकरत्न पुरस्कार व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना,यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत जुनी पेंशन शिक्षक हक्क संघटनेने परतूर तालुक्यात 6500 झाडांची लागवड केली ,त्यांच्या कार्याची दखल म्हणून प्रतिनिधीक स्वरुपात त्याच्या तालुका अध्यक्षास व सचिवास शिक्षक समाजभुषण पुरस्काराने सन्मानीत करण्याचे ठरवण्यात आले पुरस्कार प्राप्त शिक्षकांत अश्विनी मोरे (जाधव),वर्षा इज्जतवार (बाळापुरे),स्वप्ना गोडबोले(सोनखेडकर),स्मिता गायकवाड,रुपाली कुलकर्णी (सातोनकर),संदिप वाकळे,उमाकांत ठाकरे,रंगनाथ लहाने,अन्सारी नेहाल अहमद गुलाम,महादेव काळे,लक्ष्मण विचारे,विजयकुमार बोरुळे,नागनाथ गांगुलवार बाबासाहेब गायकवाड ,मंताजी ढाकरे,शेख निहाल अहमद सुभान,श्याम वराढ,संतोष मुपडे,उध्दव माहळंकर,ओकांर इंगळे,यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर विनायक भिसे यांना शिक्षकरत्न पुरस्कार व धनराज मल्लाडे व विष्णु शिंदे यांना शिक्षक समाजभुषण पुरसकाराने दि 10/10/2021 रोजी मराठा क्रांती भवन आदर्श काँलनी परतुर येथे विविध क्षेत्रातील अधिकारी,पदाधिकारी व अखील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा डाँ.रविंद्र काकडे,सुखदेव चव्हाण,विष्णु वाघमारे,सुनिल भालतीलक,व इतर मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तरी सदरील कार्यक्रमास तालुका,जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन अखील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक  संघ तालुका,जिल्हा शाखे तर्फे करण्यात येत आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....