शहरात फोफावत आहे साथरोग* *नगरपालिकेने धुरफवारणी करावी-ईजरान कुरेशी
परतुर(प्रतिनिधी) कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतांनाच गेल्या आठ दिवसापासून शहरात साथ रोग फोफावत आहे. यात मलेरिया, डेग्यू, काविळ सारख्या आजारांचा समावेश आहे.यामुळे शहरातील इंदिरानगर भागातील ११ वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.नगरपालिकेने आठ दिवसात संपुर्ण शहरात धुरफवारणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईजरान कुरेशी यांनी केली आहे.
विशेषतः खासगी रुग्णालयात या आजारांच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मार्च ते जून या चार महिन्यात कोरोना संसर्गाचे हजारो रुग्ण आढळून आले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात कोरोना रुग्णाचा आकडा एका संख्येवर आला आहे. त्यामुळे कोरोनासाठी लागू केलेले निर्बंध हटविण्यात आले. कोरोना अटोक्यात येत नाही तोच शहरात साथीच्या आजाराने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात मलेरिया, डेंग्यू, काविळ, चिकुन गुणियाचे रुग्ण मोठया संख्येने आढळून येत आहे. खासगी रुग्णालयासह दवाखान्यात देखील रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्याच्या बाजूला आणि मोकळया जागा, घराचा परिसर या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच घराच्या गच्चीवर वापरासाठी टाक्या व हौदामध्ये साठवूण ठेवलेल्या पाण्यात डेग्यू डासाची उत्पत्ती असल्याने डेग्यूची साथ देखील जोरात सुरू आहे. अगोदर ताप येतो, त्यानंतर डेग्यूची लागण होते.मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी न खेळता शहरातील प्रत्येक वॉर्डात साथरोग प्रतिबंधक धुरफवारणी करावी नसता नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ईजरान कुरेशी यांनी दिला आहे.