पाटोदा येथे राहुल लोणीकर यांच्या हस्ते युवकांचा सत्कार संपन्न
तालुक्यातील पाटोदा (माव) येथील तरुणांनी नवरात्र काळात तुळजापूर येथे पायी जाऊन मंदिरातील पेटती ज्योत घेऊन तरुणाचा जथा आल्यावर भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पाटोदा येथील तरुणांनी नवरात्र काळात तुळजापूर येथे पायी जाऊन मंदिरातील पेटती जोत घेऊन एका दिवसात परत येऊन २५० किलोमीटरचे अंतर पायी चालून यशस्वी पार केल्या मुळे हा विषय संपूर्ण तालुक्यात चर्चाचा ठरला होता. याची दखलं घेत प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी त्या तरुणांना प्रेरणा मिळावी या करीता पाटोदा येथे भेट घेत त्या युवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश शिंदे, गोकुळ खवल, चक्रधर क्षीरसागर, कृष्णा लहाने, शिवाजी खवल, यांच्यासह वीस तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपत टकले, शत्रूघ्न कणसे , लक्ष्मण शिंदे, संभाजी खवल, सदाशिव खवल, संभाजी शिंदे , भीमराव शिंदे, सुरेश पाटोदकर, सी.एन. खवल, लक्ष्मण क्षीरसागर, यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.