देगलूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित !,सुभाष साबणे २० हजाराच्या मताधिक्क्याने निवडून येणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर
भारतीय जनता पार्टीने देगलूर विधानसभा निवडणुकी साठी लागणारी सर्व तयारी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाषराव साबणे वीस हजार मतांच्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास देगलूर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी देगलूर विधानसभा मतदारसंघ सर्कल निहाय कॉमेंट बैठका घेण्यास सुरुवात केली असून प्रत्येक गावातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे लोणीकर यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी वर लोकांचा विश्वास असून त्यामुळेच पंढरपूर मध्ये कधीही न जिंकलेली जागा सुद्धा यावेळी तिन्ही पक्ष एकत्र असताना भारतीय जनता पार्टीने जिंकली त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा देगलूर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून होणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहेत असे मत निवडणूक प्रभारी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रामदास आठवले यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री यांच्या सभा बैठका झाल्या व होणार असून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी खासदार व भारतीय जनता पार्टीचे दबंग नेते किरीट सोमय्या यांची देखील सभा होणार असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले