आमदार लोणीकर यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा,दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करा नसता विधान भवनात सरकारची लक्तरे वेशीवर टांगू,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा इशारा
प्रतिनिधी
परतूर येथे एसटी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाठिंबा दिला असून दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करा नसता विधान भवनामध्ये सरकारची लक्तरे वेशीवर टांगूत असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे
या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढे म्हटले आहे की कोरोना संकटाच्या काळामध्ये या एसटी कामगारांनी खूप मोठी सेवा केली आहे मात्र हे राज्यातील सरकार यांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून यामुळे राज्यभरामध्ये 28 कामगारांनी आत्महत्या केल्या सत्तेच्या नशेत मशगुल असणाऱ्या सरकारला तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांचे दुःख दिसत नसून अतिशय अल्प वेतनावर काम करणाऱ्या अनेक राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांव कर्जाचा डोंगर आहे अशातच प्रशासन व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे देय असलेले घर भाडे नियमानुसार बसणारा ग्रेड पे देण्याचे मान्य करण्यात आलेली असूनही सरकार मात्र जाणीवपूर्वक या कामगारांचा छळ करीत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे
कर्मचारी ,शेतकरी कष्टकरी असो या राज्यात सुखी नसून सत्तेच्या नशेमध्ये मशगुल असणाऱ्या सरकारला सर्वसामान्यांच्या वेदना कळत नसल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांच्या या आंदोलनास आपला संपूर्ण पाठिंबा असून दिवाळीपूर्वी सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात नसता येणाऱ्या काळामध्ये विधानभवनात राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा शेवटी पत्रकात देन्यात आला आहे
बबनराव लोणीकर
आमदार, परतूर -99 विधानसभा मतदार संघ