शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी गणेशराव कापकर यांच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीट मुळे आग लागून दीड ते दोन एकर मधील ऊसाचे मोठे नुकसान झाले शेतातून गेलेल्या विद्युत पूरवठ्याच्या तारा मध्ये घर्षण होऊन ती ठिणगी ऊसाच्या शेतामध्ये पडली कापकर यांच्या शेताजवळच वंसत नगर वस्ती असुन त्या वस्तीतील पंचवीस ते तीस तरूणानी व शेतातील कामगारानी ही आग आटोक्यात आणली नसता इतर शेतातील ऊसाचे सुध्दा मोठे नुकसान झाले असते संबंधीत शेतकर्याचा ऊस हा तोडणीसाठी तयार आहे उस वाहतूकीसाठी त्यानी रस्त्याची डागडूजी सुधा केली दोन दीवसात ऊसाची तोडणी करण्याच्या तयारी चालू होती या आगीमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये लोबंकळणाऱ्या ताराची मोठी समस्या तळणी परिसरातील अनेक शेतकर्याच्या शेतामध्ये ही समस्या आहे महावीतरण कंपनी ने याकडे लक्ष देऊन त्याना व्यवस्थीत करून देण्याची मागणी अनेक दीवसापासुन अनेक शेतकर्यानी केली तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीच्या घटनेला शेतकर्याना सामोरे जावे लागत आहे संबंधीत शेतकर्याच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मीळाली पाहीजे अशी मागणी शेतकर्यानी केली आहे 

लोबकळणाऱ्या विद्युत तारावीषयी अनेक वेळा महावीतरण च्या कर्मचार्याकडे तक्रार करून सुध्दा त्याची दखल घेतली गेली नाही संबंधीत नुकसानीला महावीतरण जबाबदार असुन त्याच्या विरुद्ध तक्रार करणार असल्याचे गणेशराव कापकर यानी सांगीतले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....