एसटी महामंडळाचे शासकिय सेवेत विलीनीकरण करा मनसे विद्यार्थी सेनेचे ठिय्या आंदोलन
मंठा तालुक्यातील चौफुली बेलोरा फाट्यावर मनसे संस्थापक अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करुन एसटी कर्मचारी यांच्या संपाला मनसे विद्यार्थी सेनेकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी या आंदोलनाची दखल परतुर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दखल घेत आंदोलन ठिकाणी मंडळ अधिकारी श्री.गणेश कुलकर्णी यांना पाठवुन निवेदन स्विकारले आहे. हे निवेदन एसडीएम मार्फत राज्य सरकारला देण्यात आले आहे. सटी महामंडळाला शासकीय सेवेत रुजू करुन एसटी कर्मचारी यांना पगार वाढ करुन शासकीय सेवा पुरवाव्यात आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मंठा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, आदित्य केंधळे, प्रवीण केंधळे, आदी उपस्थित होते.