गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवीला होणार धर्म परिषद गोरधर्म व गोरबोली मान्यतेसाठी समाजाने एकत्र यावे - जगदीश राठोड,संचालक नेत्रा ग्रुप



 मंठा(सुभाष वायाळ)
गोर बंजारा धर्मपीठ,पोहरागड येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२१ रोजी धर्म परिषद व संस्कृतीक सोहळ्याचे आयोजन केले आहे. 
   या परिषदेसाठी जालना जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अहवाल नेत्रा ग्रुपचे संचालक जगदीश राठोड यांनी केले आहे. यासाठी  तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथील गोरबंजारा धर्मपीठ संत सेवालाल महाराज पुण्यभूमि पोहरादेवी येथे देशभरातून हजारो साधुसंत, महंत,भक्तगण व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,धर्मपीठ तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य गोरधर्म परिषद भरणार आहे.यावेळी गोर धर्म पीठाधीश्वर परमपूज्य बाबुसिंग महाराज,गोपाल चैतन्य बाबाजी, सिद्धलिंग स्वामी,प्रेमसिंग महाराज,बळीराम महाराज, दुर्गादास महाराज,कबीरदास महाराज,जुगनू महाराज,भोजू महाराज,गोपाल महाराज,धनु महाराज, हरिशरणानंद महाराज, विशुद्धानंद महाराज,मथुरा.लक्ष्मण महाराज,आथनी.पंकजपाल महाराज,दादाराव महाराज,यशवंत महाराज,परशुराम महाराज,सुनील महाराज,जनार्दन महाराज,सेना महाराज, अंबरसिंग महाराज,योगानंद बापु,दहिफळ खंदारे. सह अनेक धर्मगुरूचा समाजाला आशीर्वाद व मार्गदर्शन मिळणार आहे.यावेळी बंजारा धर्म व सांस्कृतिक परिषद होणार असून देशभरातील बंजारा प्रतिनिधी,साधू- संत,साहित्यिक,कवी,भजनी,गीतकार,प्रबोधनकार यांची उपस्थिती राहणार आहे. गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी सर्व धर्मसंस्था प्रमुखाची उपस्थिती राहणार असून,सर्व मंदिर,संस्थान प्रमुख व साधुसंत यांच्या उपस्थितीत मध्ये धर्मसत्ता माध्यमातून बंजारा समाजाचा विकास या विषयावर चिंतन व मंथन होणार आहे. संपूर्ण बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल महाराज व पांढरा झेंडा ही समाजाच्या अग्रभागी आसणार असून यावेळी साधुसंताच्या हस्ते गोरधर्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल धर्मपरिषदेतुन धर्मसत्ता- राजसत्ता-साहित्यसत्ता यावर चर्चा आसुन समाज विकासासाठी शिक्षण महत्वाचे हा संदेश दिला जाणार आहे. १० कोटी बंजारा समाजाला दिशा देण्याचे काम धर्म सत्तेच्या माध्यमातून केला जाईल व बंजारा गोरबोलीला व आपल्या स्वतंत्र चालीरीती, रुढी परंपरा असणाऱ्या गोरधर्माला मान्यता मिळवणे हा मुख्य अजेंडा या धर्म परिषदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे.यामुळे भविष्यामध्ये गोरधर्म व गोरबोली साठी संपूर्ण समाज धर्मसत्तेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल व आपल्या न्याय हक्कासाठी समाजाला एकत्र आणण्यासाठी धर्मपरिषद महत्त्वाची भूमिका बजावेल.देशांमध्ये पहिल्यांदा धर्मपरिषद होत असून या धर्मापरिषदेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.कार्यक्रमांतर्गत विविध जबाबदाऱ्या स्वयसेवेसाठी,तसेच कार्यक्रम सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बांधवांनी. विचारवंत नेते, कार्यकर्ते, मार्गदर्शक, सल्लागार यांनी संपर्क साधावा असे अवाहन गोर धर्म पीठावरून करण्यात आले आहे. याचबरोबर सदरील परीषदेसाठी जालना परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे,अवाहन नेत्रा ग्रुपचे संचालक-जगदीश राठोड यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....